भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतचा चित्रपट इमर्जन्सी हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यादरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. कोर्टाने गुरूवारी, सर्जनशील स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यवार निर्बंध लावता येणार नाहीत आणि सेंसर बोर्ड कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याच्या शक्यतेमुळे एखाद्या चित्रपटाला सर्टिफीकेट देण्यास नकार देऊ शकत नाही.