Munawar Faruqui: "पाकिस्तानला पाठवायला वेळ लागणार नाही," मुनव्वरने उडवली कोकणवासीयांची खिल्ली; नितेश राणेंनी फटकारले

Nitesh Rane: भाजप नेते नितेश राणे यांनी मुनव्वर फारुकीच्या व्हिडिओची दखल घेतली आणि संताप व्यक्त केला. त्यांनी मुनव्वरला X वर टॅग करत एक व्हिडिओ पोस्ट केला.
Nitesh Rane On Munawar Faruqui
Nitesh Rane On Munawar FaruquiEsakal
Updated on

सतत कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असणारा स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारुकी पुन्हा एकदा मोठ्या वादात सापडला आहे. यांने नुकतेच एका परफॉर्मन्सदरम्यान कोकणी लोकांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्याला संतापाचा सामना करावा लागत आहे.

मुनव्वर फारुकीच्या या संतापजनक विधानानंतर त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

दरम्यान मुनव्वर फारुकीच्या या विधानानंतर आपली प्रतिक्रिया देताना भाजप आमदार नितेश राणे यांचनी मुनव्वर फारुकीला पाकिस्तानात पाठवायला वेळ लागणार नाही असे म्हटले आहे.

काय म्हणाला होता फारुकी?

एका स्टँडअप शो दरम्यान, मुनव्वर फारुकीने प्रेक्षकांना विचारले की, इथे उपस्थित असलेला प्रत्येकजण मुंबईतीलच आहे की कोणी इतर ठिकाणाहून आले आहे? प्रेक्षकातील एकाने तो तळोजाहून आल्याचे सांगितले तेव्हा मुनव्वरने तळोजा मुंबईबाहेर असल्याबद्दल उपहासात्मक टिप्पणी केली.

मुनव्वरने पुढे कोकणवासीयांची खिल्ली उडवली. तो आता व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये "ये कोकणी लोग *** बनाते है सबको" असे म्हणताना ऐकू येत आहे.

असे असले तरी मुनव्वरच्या या विधानानंतर शोला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी त्याच्या विनोदाला टाळ्या आणि जल्लोषात प्रतिसाद दिला होता.

"पाकिस्तानला पाठवायला वेळ लागणार नाही"

भाजप नेते नितेश राणे यांनी मुनव्वर फारुकीच्या व्हिडिओची दखल घेतली आणि संताप व्यक्त केला. त्यांनी मुनव्वरला X वर टॅग करत एक व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओमध्ये नितेश राणे मुनव्वरला 'हिरवा साप' म्हणताना दिसत आहेत. तसेचे त्याच्या घरचा पत्ता माहीत असून तिथे येऊन मालवणी हिसका दाखवणार असल्याचेही राणे म्हणाले आहेत.

यावेळी राणे असेही म्हणाले की, "या हिरव्या सापाला पाकिस्तानात पाठवायला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही."

Nitesh Rane On Munawar Faruqui
Munawar Faruqui: ही कोकणी माणसं... मुनव्वर फारुकी बरळला; मनसे आक्रमक, पत्ता कळवण्याचे आवाहन

यापूर्वीही वाद

आपल्या कॉमेडी आणि वादातून लोकांमध्ये आपला ठसा उमटवणारा फारुकी 2020 सालापासून या वादांमध्ये अडकत आहे. त्यावेळी मुनव्वर त्याच्या एका यूट्यूब व्हिडिओमुळे प्रकाशझोतात आला, ज्यामध्ये पहिल्यांदा त्याच्यावर व्हिडिओमध्ये हिंदू देव-देवतांची खिल्ली उडवल्याचा आरोप करण्यात आला होता.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मुनव्वर फारुकीला अटक करण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती, मात्र त्यावेळी माफी मागितल्यानंतर तो बचावला होता. त्यानंतर 2021 च्या शेवटी मुनव्वरने 'धंडो' नावाचा शो जाहीर केला होता. तो हा शो हैदराबादमध्ये करणार होता, पण तरीही भारतीय जनता पक्षाच्या तेलंगणा युनिटने त्याचा शो आयोजित करू दिला नाही. तेव्हापासून सुरू झालेला हा वाद 2024 मध्येही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.

Nitesh Rane On Munawar Faruqui
Tripti Dimri: तृप्ती डिमरीचा जूना सुपरहीट सिनेमा पुन्हा होणार रिलीज, चाहत्यांसाठी पर्वणी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.