Entertainment News : साऊथ सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी यांचा मुलगा आणि अभिनेता नागा चैतन्य लवकरच अभिनेत्री शोभिता धुलीपालाबरोबर दुसरं लग्न करतोय. सामंथाशी घटस्फोट घेतल्यानंतर त्याच आयुष्य बराच काळ चर्चेत राहील आणि आता अखेर तो शोभिताशी लग्नगाठ बांधणार आहे. त्यांच्या लग्नापुर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झालीये. त्यातच त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.