Nana Patekar : "आम्हां शेतकऱ्यांच्या मताला काय किंमत आहे ?"; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नानांचे सरकारला खडेबोल

Nana talks about farmer issue : अभिनेते नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारवर तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली.
Nana Patekar
Nana PatekarEsakal
Updated on

Nana Patekar Interview : अभिनेते नाना पाटेकर हे फक्त अभिनयक्षेत्रातील कामामुळेच नाही तर त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्यामुळेही चर्चेत असतात. नुकतंच नानांनी दिलेल्या मुलाखतीत शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविषयी नाराजी व्यक्त केली.

नानांनी नुकतीच 'द लल्लनटाप' या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी भाष्य केलं. ते म्हणाले,"तुम्हाला सगळ्यांना माहितीये नेमकं काय आहे. सगळ्यात पहिले देश पाहिजे मग सगळं असतं. आपण शेतकऱ्यांसाठी म्हणतो कि त्यांचं कर्ज माफ करा त्या नंतरच्या गोष्टी आहेत. त्यांची जी कमाई आहे , जो खर्च आहे १०० रुपयांचा आहे स्वामी नाथन आयोगाने म्हटलंय कि त्याप्रमाणे १५० रुपये मिळाले पाहिजेत तेवढे द्या बाकी आम्हाला काही नकोय. इतर गोष्टींचेही भाव वाढले आहेत, तुमचा खर्च वाढला आहे तरीही तुम्ही मॉलमध्ये जाऊन जीन्स खरेदी करताना भाव करता का? तिथे जी किंमत दिली असेल त्याच किंमतीत तुम्ही घेऊन येता ना मग जेव्हा शेतकरी माल विकायला घेऊन येतो तेव्हा का भाव करता. काय म्हणजे? आता माझ्या फार्महाऊसवर गहू, ज्वारी, बाजरी कापलीये. आम्हाला पीक कमी आलं तरीही चालून जातं कारण दुसऱ्यांदा लावण्यासाठी माझ्याकडे पैसे आहेत पण ज्याच्याकडे कमी धान्य आल्यावर दुसऱ्यांदा पीक लावण्यासाठी पैसे नाहीत तो जाणार कुठे ? त्याची पूर्ण धनदौलत उघड्यावर आहे. पक्षी , हरीण, ससा, डुक्कर, नीलगायी, खारी येऊन त्याचं नुकसान करतात पण त्याची तक्रार करणार कुठे ? शेतकरी म्हणून मी आत्महत्या करू शकतो तर समोरच्यावर हात उचलणंही मला शक्य आहे कारण मी आधीच मरतोय. आम्ही शेतकरी काही फार मागत नाही आहोत. थोडंसच मागतोय. भारतात ६० टक्के शेतकरी आहेत पूर्वी ८५-९० % होते. आता पावसाचाही काही भरवसा नाही. दुबार पेरणी करायलाही आमच्या शेतकऱ्याकडे पैसे नाहीये. आम्ही दारू फक्त काही विसरण्यासाठी पितो. आम्हा शेतकऱ्यांकडे काहीच नाही. आम्ही ज्यांना मत दिलं त्यांनी दुसऱ्याशीच युती केली. कोण कोणासोबत जातंय आम्हाला कळत नाही. आम्हा शेतकऱ्यांच्या मताची काय किंमत आहे ? " या शब्दात नानांनी नाराजी व्यक्त केली.

Nana Patekar
Nana Patekar: 'वेलकम ३' मध्ये का नाहीयेत नाना पाटेकर? स्वतः सांगितलं कारण, म्हणाले-

नानांनी मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर नाम फाउंडेशनची स्थापना केली. आता ही संस्था संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांसाठी काम करते. संपूर्ण भारतातील अनेक तरुण या संस्थेशी जोडले आहेत. शेतकरी आणि त्यांच्या मुलांचं शिक्षण यासाठी नानांची ही संस्था काम करते.

Nana Patekar
Nana Patekar : "मला सर्व पक्षांनी..." ; राजकारणात येण्याबद्दल नानांनी केला खुलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.