Nana Patekar : "विधूच्या काही गोष्टी मला आवडत नाहीत", त्या भांडणाबद्दल नानांचा खुलासा ; संजय भंसाळींबद्दल म्हणाले...

Nana Patekar Talks About Sanjay Leela Bhansali : अभिनेते नाना पाटेकर यांनी संजय लीला भन्साळी, विधू विनोद चोप्रा यांच्याशी असलेल्या भांडणाबद्दल खुलासा केला.
Nana Patekar, Vidhu Vinod Chopra, Sanjay Leela Bhansali
Nana Patekar, Vidhu Vinod Chopra, Sanjay Leela BhansaliEsakal
Updated on

Nana Patekar Interview : भारतीय सिनेविश्वातील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी आजवर अनेक सिनेमे, नाटक यांमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख प्रेक्षकांच्या मनावर उमटवली आहे. उत्तम अभिनेते असलेले नाना त्यांच्या तापट स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. आजवर अनेक दिग्दर्शकांबरोबर नानांचं भांडण झालं आहे पण नुकतंच एका मुलाखतीमध्ये नानांनी संजय आणि विधू विनोद चोप्रा यांच्याशी नेमकं कशावरून भांडण झालं याचा खुलासा केला.

नाना म्हणाले...

नुकतीच नानांनी 'द लल्लनटाप' या चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी मुलाखतकाराने नानांना संजय लीला भंसाळींशी तुमचं नेमकं काय भांडण झालं असं विचारलं तेव्हा सुरुवातीला नानांनी उत्तर देणं टाळलं. नंतर ते म्हणाले,"हे काही एकच भांडण नाही अनेक भांडणं झाली आहेत. पण संजय चांगला दिग्दर्शक आहेत. माझ्याबरोबर सीमा बिस्वास होती. होतं काय सीमाला हार्ट अटॅक येतो आणि तिच्याकडे मी पाठ करू जुगार खेळत असतो. तर संजयचं म्हणणं होतं तिला जेव्हा अटॅक येतो तेव्हा मी मागे वळून बघावं पण मी त्याला नकार दिला. संजयला असं दाखवायचं होतं कि ते नवरा बायको मूकबधिर आहेत पण तरीही त्यांच्यात काहीतरी कनेक्शन आहे. तिला अटॅक येताना याला काहीतरी जाणवतं हे दाखवण्यासाठी मी मागे वळलं पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं आणि मी त्याला नकार दिला. त्यावरून वाद झाला. असे अनेक वाद झाले. कधीतरी मी वादात काहीतरी उलट सुलट बोललो असें त्यामुळे मी पुन्हा संजय बरोबर काम केलं नाही. "

Nana Patekar, Vidhu Vinod Chopra, Sanjay Leela Bhansali
Nana Patekar:'मी किती नालायक होतो...' मोठ्या मुलाच्या निधनावर पहिल्यांदाच बोलले नाना पाटेकर; म्हणाले- 'मला लाज वाटायची की'

त्यानंतर त्यांना विधू विनोद चोप्रा यांच्याशी परिंदा सिनेमावेळी झालेल्या वादाबद्दल विचारलं. तेव्हा नाना म्हणाले कि,"विधू मला अजिबात आवडत नाही. त्याच्या काही सवयी अजूनही मला पटत नाही. माझं माझ्या रागावर अजिबात नियंत्रण नाही. कोणत्याही सीनचा एक सूर असतो. प्रत्येकाशी बोलत असताना आपण वेगवगेळ्या सुरात बोलतो. पण जेव्हा कोणताही सीन बोलताना अक्शन जोरात बोललं जातं तेव्हा ते अभिनेत्याच्या डोक्यात तेच कोरल जातं आणि त्याचा, त्या सीनचा सूर बदलतो. जर सीन शांततेचा असेल तर हळू बोललं पाहिजे किंवा त्या टोनमध्ये बोललं पाहिजे म्हणजे अभिनेता त्या प्रमाणे अभिनय करू शकतो असं मला वाटतं. " असं नाना म्हणाले. परिंदा सिनेमावेळी नाना आणि विधू विनोद चोप्रा यांच्यामध्ये भांडण झालं होतं आणि हे भांडण इतकं वाजलं त्यांच्यात चक्क मारामारी झाली आणि त्या भांडणात नानांच्या अंगावर असलेला कुर्ता फाटला होता .

Nana Patekar, Vidhu Vinod Chopra, Sanjay Leela Bhansali
Nana Patekar:'आणि ऋषीने घाणेरड्या शिव्या द्यायला सुरुवात केली...', नाना पाटेकरांनी सांगितलं सेटवर नेमकं काय घडलेलं

नानांचा लवकरच 'जर्नी' हा सिनेमा येत असून गदर फेम दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.