VIDEO: भर कार्यक्रमात अभिनेत्रीला स्टेजवर ढकललं; अभिनेत्यावर होतीये कडकडून टीका, व्हिडीओ व्हायरल

Nandamuri Balakrishna: व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नंदमुरी बालकृष्ण हे भर कार्यक्रमात एका अभिनेत्रीला स्टेजवर ढकलताना दिसत आहेत.
भर कार्यक्रमात अभिनेत्रीला स्टेजवर ढकललं; अभिनेत्यावर होतीये कडकडून टीका, व्हिडीओ व्हायरल
Nandamuri Balakrishnasakal
Updated on

Nandamuri Balakrishna: तेलुगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि राजकारणी नंदमुरी बालकृष्ण (Nandamuri Balakrishna) उर्फ ​​बलय्या (Balayya) हे सध्या चर्चेत आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नंदमुरी बालकृष्ण हे भर कार्यक्रमात एका अभिनेत्रीला स्टेजवर ढकलताना दिसत आहेत.

गँग्स ऑफ गोदावरी या चित्रपटाच्या इव्हेंटमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नंदमुरी बालकृष्ण हे अभिनेत्री अंजलीला ढकलताना दिसत आहेत. नंदमुरी यांनी ढकलल्यानंतर अंजली हसते, असं व्हिडीओमध्ये दिसत आहे. पण नंदमुरी यांच्या यांनी अंजलीला दिलेल्या या वागणुकीमुळे नेटकरी त्यांच्यावर टीका करत आहेत.

नेटकऱ्यांनी केली टीका

चित्रपटाच्या इव्हेंटमधील नंदमुरी बालकृष्ण यांचा व्हायरल झालेल्या व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी त्यांच्यावर भडकले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी नंदमुरी बालकृष्ण यांचा इव्हेंटमधील व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "हा काय बदमाशपणा आहे?"

पाहा व्हिडीओ:

नंदमुरी यांनी अभिनेत्रीला चिमटा काढला होता

नंदमुरी हे या आधी देखील त्यांच्या वर्तवणुकीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. एकदा, नांदामुरी यांनी त्यांच्या असिस्टंटला चापट मारली होती. तसेच 2015 मध्ये, नंदमुरी यांनी त्यांच्या 'डिक्टेटर' या चित्रपटाच्या लाँचच्या वेळी अंजलीला स्टेजवर चिमटा काढला होता.

'गँग्स ऑफ गोदावरी' हा चित्रपट 31 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विश्व सेन, अंजली आणि नेहा शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

भर कार्यक्रमात अभिनेत्रीला स्टेजवर ढकललं; अभिनेत्यावर होतीये कडकडून टीका, व्हिडीओ व्हायरल
Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये तरुणीने केल्या सर्व मर्यादा पार, अश्लील डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.