Friday Release On Ott : अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर जुलैपासून रंगणार 'झकास फ्रायडेस'; प्रेक्षकांना पाहायला मिळणार देशी-विदेशी सिनेमांचा महाराष्ट्रीयन तडका...

Movie Release On Ultra Zakass Marathi : अल्ट्रा झकास मराठीवर आता देशी विदेशी गाजलेल्या सिनेमे आता खास मराठी भाषेत पाहायला मिळणार आहेत.
Ultra Zakass Marathi
Ultra Zakass MarathiEsakal

मुंबई 1 जुलै 2024: अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटने 'अल्ट्रा झकास फ्रायडेस' वर ब्लॉकबस्टर चित्रपट सादर केले. ही मोहीम प्रेक्षकांना मराठीत डब केलेल्या हॉलीवूडच्या ब्लॉकबस्टर्ससह अनेक भाषांमधील सुपरहिट चित्रपटांकडे पाहण्यासाठी सुरु केली आहे.

या उपक्रमाचा उद्देश्य मराठी भाषिक प्रेक्षकांपर्यंत उच्च श्रेणीतील प्रादेशिक भाषा, आशियाई आणि हॉलीवूड सिनेमे दाखवणे हा आहे, जेणेकरून ते देखील त्यांच्या मूळ भाषेत या सिनेमांचा सर्वोत्तम आनंद घेऊ शकतील.

दर शुक्रवारी, अल्ट्रा झकास फ्रायडेज जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या सुपरहिट निवडक चित्रपट दाखवेल. हे चित्रपट ॲक्शन-पॅक थ्रिलर्स आणि रोमँटिक ड्रामापासून ॲनिमेटेड फीचर्स आणि हॉरर फ्लिक्सपर्यंत विविध विषयांवर आधारित असतील.

घिल्ली (धडाकेबाज घिल्ली )

साऊथचा मेगास्टार विजय थलापथी आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांचा तमिळ चित्रपट घिल्लीने बॉक्स ऑफिसवर त्याच्या ॲक्शन, रोमान्स आणि गाण्यांसह प्रचंड यश मिळवले होते. तसेच आता प्रेक्षकांना चित्रपट मराठीमध्ये पाहण्याचा आनंद घेता येईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन धरणी यांनी केले असून ही कथा वेलू या महत्त्वाकांक्षी कबड्डीपटूची आहे जो प्रादेशिक कबड्डी खेळात भाग घेण्यासाठी मदुराईला आला होता. जिथे तो धनलक्ष्मीला तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करणाऱ्या माणसापासून वाचवतो.

बावरे प्रेम हे

“बावरे प्रेम हे” ह्या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, उर्मिला कोठारे आणि विद्याधर जोशी यांची अप्रतिम स्टारकास्ट असून या चित्रपटाचे दिग्दर्शक अजय नाईक यांनी केले आहे. नील त्याच्या मित्रासोबत गोवा ट्रीपला जातो, जिथे त्याचा अनन्या नावाच्या मुलीशी वाद होतो. पुन्हा जेव्हा त्याची भेट अनन्याशी होते तेव्हा तो माफी मागतो पण त्या बदल्यात ती नीलकडे तिचं हरवलेल पुस्तक शोधून देण्यात मदत मागते. मदत केल्यानंतर रोज भेटून एकत्र फिरत असताना नीलच्या मनात अनन्याबद्दल भावना निर्माण होतात. नीलच्या मनात प्रेमाची भावना आहे हे कळल्यावर अनन्या त्याच्या प्रेमाला स्वीकारेल का ?

ए. एम. आय (नवयुग)

जेव्हा तंत्रज्ञान मानवी मनावर ताबा मिळवतो आणि तुम्हाला काही भयानक गोष्टी करायला भाग पडतो ज्यांनी करून तुमच्या जीवनाला ही धोका होऊ शकतो. हॉलीवुडचा ए. एम. आय म्हणजेच मराठी नाव नवयुग चित्रपटाचे दिग्दर्शक रस्टी निक्सन आहेत. ही कथा एक सतरा वर्षांची मुलगी कॅसी बद्दल आहे जिने आपली आई गमावले आहे आणि ती तिच्या फोनवर कृत्रिम तंत्रज्ञानाशी नाते निर्माण करते जी तिच्या मनाशी खेळते आणि तिला भयानक गोष्टी करायला लावते. कॅसी या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अंत करू शकेल का? किंवा या प्रक्रियेत ती स्वतःला इजा करेल?

गन्स ट्रान्स ॲक्शन

तेलुगू चित्रपट गन्स ट्रान्स ॲक्शन स्टारर चैतन्य पासुपुलेती , हीना राय आणि सुदर्शन आहे आणि चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक सिद्धांत यांनी केले असून तुम्हाला हा चित्रपट मराठीमध्ये पाहायला मिळेल. हा चित्रपट चार मनोरुग्णांवर आधारित आहे ज्यांचा एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याशी क्रूर सामना होतो. या चित्रपटातील पात्रांची रचना GTA या अतिशय प्रसिद्ध गेमच्या आधारे करण्यात आली आहे.

Ultra Zakass Marathi
Movies Release On Friday : चित्रपट शुक्रवारीच का प्रदर्शित केले जातात? वाचा काय आहे कारण

क्लिअरिंग (बापमाणूस )

डेव्हिड मॅटालॉन यांचा हॉलीवूड चित्रपट 'द क्लिअरिंग' म्हणजेच बापमाणूस आता तुम्ही मराठीमध्ये पाहू शकता. या चित्रपटाची कथा वडील आणि त्याचा मुलीबद्दल आहे जे कॅम्पिंग ट्रिपला गेले असतात आणि तिथे त्याला खतरनाक झॉम्बीजचा सामना करून आपल्या बेपत्ता झालेल्या मुलीला शोधायच असतं. तो स्वतः सोबत त्याच्या मुलीला वाचवण्यात यशस्वी होईल का ?

Ultra Zakass Marathi
Jatraa Movie: "मला नागीणसारखे कपडे..."; 'कोंबडी पळाली' गाण्यातील कॉस्च्युममुळे क्रांतीने अंकुशला झापलं

कधी आणि कुठे बघायचे ?

अल्ट्रा झकास ओटीटी प्लॅटफॉर्मवर "अल्ट्रा झकास फ्रायडेस" पहा जे तुमच्यासाठी ५ जुलै २०२४ रोजी घिल्ली (धडाकेबाज ) घेऊन येईल, तसेच रोमान्स आणि हॉरर थ्रिलर 'बावरे प्रेम हे' आणि १२ जुलै २०२४ रोजी ए. एम. आय (नवयुग) Jhakaas Marathi वर. याव्यतिरिक्त, अल्ट्रा झकास मध्ये आणखी दोन गुन्हे, ॲक्शन, ड्रामा आणि मिस्ट्री यांनी भरलेले चित्रपट दाखवले जातील: 19 जुलै 2024 रोजी गन्स ट्रान्स ॲक्शन आणि 26 जुलै 2024 रोजी द क्लिअरिंग बापमाणूस) हा सिनेमा प्रसारित करण्यात येणार आहे.

Ultra Zakass Marathi
Maharaj Movie Court Case : 'महाराज' सिनेमाच्या प्रदर्शनावरील स्थगिती कायम ; कोर्ट आज फैसला सुनावणार ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com