Nawazuddin Siddiqui: गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन आणि आलिया सिद्दीकी (Aaliya Siddiqui) यांच्यात अनेक महिन्यांपासून मतभेद सुरु होते. आलियानं नवाजुद्दीनवर अनेक आरोप केले. अखेर आता नवाजुद्दीन आणि आलिया यांच्यातील वाद मिटला आहे. नवाजुद्दीन आणि आलिया हे आपली मुलगी शोरा आणि मुलगा यानी यांच्यासाठी मतभेद विसरून एकत्र आले आहेत.
आलिया आणि नवाजुद्दीन यांच्यातील वाद आता मिटला आहे. आलियाने तिच्या नवाजुद्दीनच्या लग्नाचा 14 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये आलिया,नवाजुद्दीन यांच्यासोबत शोरा आणि यानी दिसत आहेत. आलियानं या फोटोला कॅप्शन दिलं, "आम्ही फॅमिलीसोबत आमच्या लग्नाचा 14 वा वाढदिवस साजरा केला."
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये आलियानं सांगितलं,"गेल्या काही दिवसांपासून माझ्या आयुष्यात काही गोष्टी बदलल्या आहेत. मला वाटले की जेव्हा आपण वाईट गोष्टी जगासोबत शेअर करतो तेव्हा चांगल्या गोष्टीही शेअर केल्या पाहिजेत. मला वाटतं जे चांगलं आहे तेही पाहिलं पाहिजे."
पुढे आलियानं सांगितलं, "मला असं वाटतं की आमच्या नात्यात कुठल्यातरी तिसऱ्या व्यक्तीमुळे अडचणी निर्माण झाल्या. पण आता आमच्यातील गैरसमज दूर झाला आहे. आमच्या मुलांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आता आयुष्यात वेगळं राहण्याचा ऑप्शन नाहीये, कारण आमची मुलंही मोठी होत आहेत.तसेच नवाजचा शोरावर खूप जीव आहे आणि जे काही घडले त्यानंतर ती खूप नाराज होती. तिला ते सहन झाले नव्हते. त्यामुळे आम्ही ठरवले की यापुढे आम्ही भांडणार नाही आणि शांततेने एकत्र राहू."
2020 मध्ये, आलियाने नवाजुद्दीनला व्हॉट्सॲप आणि ईमेलद्वारे घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. आलियानं नवाजुद्दीनवर बरेच आरोप केले होते. आलियाने नवाजुद्दीनचा भाऊ शमास याच्यावरही हिंसाचाराचे आरोप केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.