Tula Shikvin Changlach Dhada : अधिपतीच्या आयुष्यात आल्या नव्या मास्तरीण बाई ; नव्या प्रोमोची होतेय चर्चा

Tula Shikvin Changlach Dhada : झी मराठीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत भुवनेश्वरीच्या कारस्थानामुळे अधिपतीच्या आयुष्यात नव्या मास्तरीण बाईंची एंट्री होणार आहे. पहा मालिकेचा खास प्रोमो.
Tula Shikvin Changlach Dhada serial new twist
Tula Shikvin Changlach Dhada serial new twist
Updated on

Tula Shikvin Changlach Dhada Serial Update : झी मराठीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही प्रेक्षकांची लाडकी मालिका. शिक्षणासाठी धडपडणारी अक्षरा आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा, करोडोच्या संपत्तीचा मालक असलेला अधिपती यांची हटके लव्हस्टोरी असलेली मालिका प्रेक्षकांना खूप आवडते. या मालिकेत काही ना काही ट्विस्ट गेल्या काही काळापासून पाहायला मिळत आहेत आणि आता मालिकेत नवीन पात्राची एंट्री होणार आहे.

नुकताच झी मराठीच्या इंस्टाग्राम हँडलवर मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आणि हा प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आहे. अक्षरा भुवनेश्वरीला अधिपतीसाठी गाण्याची शिकवणी लावण्याचा सल्ला देते पण भुवनेश्वरीला ही कल्पना अजिबात पटत नाही. पण त्यानंतर भुवनेश्वरीच्या डोक्यात अक्षरा आणि अधिपतीमध्ये दुरावा आणण्याची नवी कल्पना येते आणि ती अधिपतीला गाणं शिकवण्यासाठी एका खास गायिकेची निवड करते.

Tula Shikvin Changlach Dhada serial new twist
Zee Marathi Awards 2021: 'या' लोकप्रिय मालिकेला मिळाली सर्वाधिक नामांकनं

मालिकेच्या प्रोमोमध्ये भुवनेश्वरी अक्षराला आजपासून अधिपतीची गाण्याची शिकवणी सुरु असं सांगते आणि त्यांच्या घरी आलेल्या नव्या शिक्षिकेची ओळख करून देते. हीच नाव सरगम असून या नावाजलेल्या गायिका आहेत यांचे टीव्हीवर आणि रेडिओवर कार्यक्रम होतात असं भुवनेश्वरी म्हणते. तेव्हा अधिपती सरगमला मास्तरीणबाई अशी हाक मारतो आणि त्यामुळे अक्षरा दुखावते असं दाखवण्यात आलं.

पहा प्रोमो:

अभिनेत्री सानिया चौधरी हिने या मालिकेत आता एंट्री घेतली असून ती सरगम या गायिकेची भूमिका साकारणार आहे. तिच्या येण्यामुळे अक्षरा आणि अधिपतीच्या नात्यात काय बदल घडणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. तेव्हा पाहायला विसरू नका तुला शिकवीन चांगलाच धडा सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त झी मराठीवर.

'या' आधीही सानिया आणि शिवानीने केलंय एकत्र काम

शिवानी आणि सानियाने या मालिकेच्या अगोदरही एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. सानिया आणि शिवानीने या अगोदर ' सांग तू आहेस का? ' या स्टार प्रवाहावरील मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेत त्यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकरही काम करत होता. ही एक हॉरर आणि गूढ प्रकारातील मालिका होती.

याशिवाय सानियाने या आधीही बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. 'साजणा' या मालिकेतून तिने टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं यासोबतच तिने झी मराठीवरील 'दार उघड बये' या मालिकेत तिने साकारलेली मुक्ता या संबळवादक मुलीची भूमिकाही खूप गाजली होती.

Tula Shikvin Changlach Dhada serial new twist
माझ्या लग्नात आपली भेट झाली तेव्हाच.. शिवानीने ऑनस्क्रीन सासूबाईंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा| Shivani Rangole

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.