OTT Release This Week: ओटीटीवर प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; वीकेंडला घरबसल्या बघा वेब सीरिज आणि चित्रपट

OTT Release This Week: तुम्ही या वीकेंडला मित्रांसोबत किंवा कुटुंबियांसोबत घरबसल्या वेब सीरिज आणि चित्रपट पाहू शकता.
ओटीटीवर प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; वीकेंडला घरबसल्या बघा वेब सीरिज आणि चित्रपट
OTT Release This Weeksakal

OTT Release This Week: ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. जिओ सिनेमावर (Jio Cinema) उत्तम कंटेंट येत असतो. तसेच नेटफ्लिक्स (Netflix) आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होत असतात. अशातच तुम्ही या वीकेंडला मित्रांसोबत किंवा कुटुंबियांसोबत घरबसल्या वेब सीरिज आणि चित्रपट पाहू शकता.

'गांठ'

'गांठ' या वेब सीरिजमध्ये ऑफिसर गदर सिंग यांची कथा दाखवण्यात आली आहे. दिल्लीत घडलेल्या एका प्रकरणाची गदर सिंग कशी तपासणी करतात? या तपासणीदरम्यान कोणकोणते धक्कादायक गोष्टी समोर येतात, हे या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. ही सीरिज तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता.

'दो और दो प्यार'

विद्या बालन, प्रतीक गांधी आणि इलियाना डिक्रूज यांचा 'दो और दो प्यार' हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात एक्ट्रा मॅरिटल अफेअर असणाऱ्या जोडप्यांची कथा दाखवण्यात आली आहे.

द बॉइज (सीझन-4)

द बॉइज या वेब सीरिजच्या चौथ्या सीझनचे पहिले तीन एपिसोड प्राइम व्हिडीओवर रिलीज झाले आहेत. या वेब सीरिजमध्ये कार्ल अर्बन, जॅक क्वेड, अँटनी स्टार, जेसी टी. अशर, एरिन मोरियार्टी आणि चेस क्रॉफर्ड या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

हाऊस ऑफ द ड्रॅगन-2 (House of the Dragon-2)

हाऊस ऑफ द ड्रॅगन-2 ही वेब सीरिज जिओ सिनेमावर रिलीज झाली आहे. या सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता हाऊस ऑफ द ड्रॅगनचा दुसरा सिझन इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, बंगाली आणि मराठी या भाषांमध्ये रिलीज झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com