Entertainment News : सोनी सब टेलिव्हिजनवरील तारक मेहता का उलटा चष्मा ही लोकप्रिय मालिका. पण गेल्या काही काळापासून ही मालिका त्यातील अंतर्गत वादांमुळेच चर्चेत आहे. १६ वर्षात अनेक कलाकारांनी मालिका सोडली. यातील काही कलाकारांनी शोचे निर्माते असित मोदींवर अनेक आरोपही लावले. त्यात या मालिकेत सोनू भिडे ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री पलक सिंधवानीला निर्मात्यांनी नोटीस पाठवल्यानंतर तिने निर्मात्यांवर मानसिक छळाचा आरोप केला आहे.