Panchayat 3 : पंचायत ३ साठी कलाकारांनी घेतलं 'इतकं' मानधन ; सचिव कि प्रधान कुणी मारली बाजी?

'पंचायत ३' वेबसिरीजसाठी कलाकारांनी घेतलेलं मानधन उघड झालं आहे. कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतलं जाणून घेऊया.
Panchayat 3
Panchayat 3Esakal
Updated on

'पंचायत ३' या आगामी वेबसिरीजची सगळीकडेच चर्चा आहे. २८ मे ला ही वेबसीरीज 'अ‍ॅमेझॉन प्राईम' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. सोशल मीडियावर या वेबसिरीजचा ट्रेलर ट्रेंडिंगमध्ये असून अनेकजण या सिरीजची वाट पाहत आहेत.

नुकतंच या सिरीजमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना किती मानधन मिळालं हे जाहीर करण्यात आलं. कोणत्या कलाकाराने या वेबसीरिजमध्ये काम करण्यासाठी किती मानधन घेतलं जाणून घेऊया.

टाईम्स नाऊ नवभारतने लिहिलेल्या रिपोर्टनुसार, सचिवजी म्हणजेच अभिनेता जितेंद्र कुमारने या भूमिकेसाठी सगळ्यात जास्त मानधन घेतलं आहे. जितेंद्र प्रत्येक एपिसोडसाठी सत्तर हजार रुपये इतकं मानधन घेतलं आहे.

तिसऱ्या सीजनसाठी इतकं मानधन घेणारा संजय हा एकमेव कलाकार ठरला आहे.

प्रधानजी बृजभूषण दुबेही भूमिका साकारणारे रघुबीर यादव यांनी ही भूमिका साकारताना एका एपिसोडसाठी ४० हजार रुपये मानधन घेतलं आहे. सचिवच्या पाठोपाठ रघुबीर यांचीही या सिरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

या सिरीजमध्ये सचिवांच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या नीना गुप्ता यांनी एका एपिसोडसाठी पन्नास हजार रुपये इतकं मानधन घेतलं आहे. त्यांनीही साकारलेली भूमिका खूप गाजलीये.

Panchayat 3
सचिवजींसोबत रोमान्स करणारी रिंकी कोण? panchayat 3 मध्ये आहे कडक एंट्री...

फुलेरा ग्रामपंचायतचे सहाय्यक विकासची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता चंदन रॉयला २० हजार रुपये एका एपिसोडसाठी मानधन देण्यात आलं आहे तर तर उप-प्रधान प्रल्हाद पांडेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता फैजल मलिकनेही एका एपिसोडसाठी २० हजार रुपये मानधन घेतलं आहे.

वेळेआधीच प्रदर्शित करण्यात आला ट्रेलर

पंचायत सीजन ३ चा ट्रेलर वेळेआधीच रिलीज करण्यात आला. १७ मे ला या वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित होणार होता पण प्रेक्षकांच्या वाढत्या उत्सुकतेमुळे १५ मे ला या वेबसिरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला.

पंचायतचा सचिव म्हणून अभिषेक परत आला आहे. पण त्याला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गावातील नवीन संकटांचा सामना करावा लागणार आहे. अभिषेकला काम सांभाळून परीक्षेची तयारीही करायची आहे तर गावातील विरोधी पक्ष पुन्हा एकदा भिडणार असल्याचं या सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे.

पहा ट्रेलर:

वेबसिरीजमध्ये दिसणार 'हे' कलाकार

जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, चंदन रॉय, सान्विका आणि नीना गुप्ता या कलाकारांच्या या वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिका आहेत. दीपक कुमार मिश्रा यांनी या वेब सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे.

Panchayat 3
Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Related Stories

No stories found.