सध्याची सगळ्यात जास्त चर्चा असलेली वेब सिरीज म्हणजे 'पंचायत ३'. फुलेरा गाव आणि तेथील अतरंगी गावकरी, त्यांचा कायम सामना करणारा सचिव यांची गोष्ट असलेली ही सिरीज सध्या खूप गाजतेय.
या सिरीजमध्ये प्रल्हाद ही महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या फैसल मलिक यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कंगना बद्दल केलेल्या वक्तव्याने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं.
वेबसीरिजच्या प्रोमोशन निमित्ताने फैजल यांनी नुकतीच टीव्ही ९ ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी कंगनाच्या राजकीय प्रवेशाबाबत त्यांचं मत व्यक्त केलं.
ते म्हणाले,"कंगना रनौत खूप चांगली आहे. पूर्वी ती अशी नव्हती, आता वाटतंय जणू ती वेगळीच कोणीतरी आहे. मला असं वाटतं की एखाद्या कलाकाराचं काम अभिनय करण्याचं असेल तर त्याने फक्त तेच केलं पाहिजे आणि इतर गोष्टी करू नयेत. कंगनाची बहीण रंगोली मला ओळखते. आम्ही एकत्र काम केले आहे. दीड वर्ष एकाच ऑफिसमध्ये काम केलं, तो एक चांगला अनुभव होता.
कंगना एक उत्तम अभिनेत्री आहे, पण मला वाटतं की ती इतक्या मेहनतीने जी गोष्ट शिकली आहे, त्यावर तिने लक्ष केंद्रित करावं. तिने बॉलीवूड सोडू नये आणखी काम करावं." असं मत त्यांनी यावेळी मांडलं.
यासोबतच फैजल देशातील राजकीय परिस्थितीवरही व्यक्त झाले. ते म्हणाले,"कलाकारांनी राजकारणात येऊ नये असं मला वाटतं. कारण, राजकारण करणं हे राजकारण्याचं काम आहे. राजकारण हे सतत चालणारं काम आहे. राजकारणासाठी एक कार्यकर्ता वर्षानुवर्षे काम करतो आणि त्याला हटवून मुंबईतून एक व्यक्ती आणली जाते आणि तिकीट दिलं जातं, त्यामुळे त्या कार्यकर्त्याचं मन नक्कीच दुखावतं. तो कार्यकर्ता त्या शहरातील त्या लोकांमध्ये फिरलेला असतो, त्यांचा नेता तोच असतो. लोकांच्या शिव्या कोण खातंय, कार्यकर्ता खातोय. मग अचानक तुम्ही हिंदी चित्रपटसृष्टीतून कोणालातरी आणता आणि त्याला म्हणता की तू खासदार हो. हे सगळं बरोबर नाही, कारण खासदार नेहमी त्या कार्यकर्त्यांनी व्हायला पाहिजे, जो लोकांच्या समस्या समजून घेतो." असं मतही त्यांनी यावेळी मांडलं.
पंचायत ३ आता अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली असून फैजल यांच्यासोबत या वेब सिरीजमध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव आणि चंदन रॉय यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या वेब सीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.