Panchayat 3: पंचायत आहे शाहरुख खानच्या 'या' शोची कॉपी? सोशल मीडियावर होतेय चर्चा

Panchayat 3 based on this show: सध्या सगळीकडे गाजणारी वेबसिरीज 'पंचायत ३' शाहरुखच्या गाजलेल्या मालिकेवर आधारित असल्याची चर्चा आहे.
Panchayat 3
Panchayat 3Esakal
Updated on

Panchayat 3 : अमेझॉन प्राईमवर रिलीज झालेली 'पंचायत ३' ही वेब सिरीज चांगलीच गाजतेय. फुलेरा गावातील ग्रामस्थ आणि त्यांच्या गावातील सचिव अभिषेक यांची इंटरेस्टिंग गोष्ट असलेला ही वेबसिरीज चांगलीच गाजतेय. पण तुम्हाला माहितीये का ? सध्या 'पंचायत ३' ही एका जुन्या टेलिव्हिजन शोची कॉपी असल्याची चर्चा रंगली आहे.

'पंचायत ३' ही वेब सिरीज नव्वदच्या दशकात गाजलेला टेलिव्हिजन शो 'उमीद' ची कॉपी असल्याची चर्चा रंगलीये. या शोमध्ये अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका होती आणि हा शो टेलिव्हिजनवर खूप गाजला होता.

पण खरं सांगायचं तर पंचायत ३ ही वेब सिरीज 'उमीद' या टेलिव्हिजन शोची कॉपी नसून या शोपासून प्रेरणा घेऊन ही सिरीज बनवण्यात आली आहे.

Panchayat 3
Panchayat 3: स्वप्नांना वय नसतं! गंभीर आजार जडला, तरीही हार मानली नाही; 'पंचायत'मधील अम्माजींचा प्रेरणादायी प्रवास

'उमीद' आणि 'पंचायत ३' मधील साम्य

'उमीद' या शोमध्ये गावात आलेल्या बँक मॅनेजरची गोष्ट दाखवण्यात आली होती. गावात नवीनच आलेला बँक मॅनेजर आणि ग्रामस्थांमधील त्याचे संबंध, त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी तो करत असलेले प्रयत्न यावर ही मालिका आधारित होती आणि तशीच कथा पंचायत या वेबसीरिजमध्येही दाखवण्यात आली आहे. पंचायत मध्ये गावात आलेला सचिव अभिषेक गावकऱ्यांच्या समस्यांचे निराकारण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात त्याला येणाऱ्या अडचणी, त्यातून निर्माण होणारा विनोद यावर ही वेब सिरीज आधारित आहे.

अभिनेता शाहरुख खानने उमीद या मालिकेत गावात आलेल्या बँक मॅनेजरची भूमिका साकारली होती आणि तशीच काहीशी भूमिका अभिषेक साकारणाऱ्या जितेंद्र कुमारने साकारली आहे.

या कथेवर आधारित आहेत दोन्ही शो

विशेष म्हणजे 'पंचायत ३' आणि 'उमीद' हे दोन्ही शो रवींद्रनाथ टागोर यांच्या 'पोस्टमास्तर' या गाजलेल्या कथेवर आधारित आहे. एका गावातील पोस्टमास्तर आणि गावकऱ्यांशी त्याचे असलेले नातेसंबंध यावर ही कथा रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली होती. या कथेपासूनच प्रेरणा घेत हे दोन्ही शो बनवण्यात आले आहेत.

पंचायत वेबसिरीजचा एक्स फॅक्टर

गावातील रोजच्या समस्यांचा सचिव अभिषेक करत असलेला सामना आणि त्या समस्यांसाठी तो शोधत असलेले उपाय हा या शोचा एक्स फॅक्टर ठरला आहे. अतिशय साधी आणि ग्रामीण भागाशी सिरीजचा असलेला कनेक्ट यामुळे हा सिरीज इतरांपेक्षा वेगळी ठरलीये.

Panchayat 3
Panchayat 3: पंचायतमधील रिंकीच्या मैत्रिणीला करावा लागला होता कास्टिंग काऊचचा सामना; म्हणाली, "अत्यंत अपमानास्पद..."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com