Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 मधून अभिनेते पंढरीनाथ कांबळे काल घराबाहेर पडले. इतर सदस्यांपेक्षा कमी मतं पडल्याने त्यांचा प्रवास संपला. घरातून बाहेर पडल्यावर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ते त्यांच्या प्रवासाविषयी भरभरून बोलले. पण अभिजीत सावंतवर त्यांनी धक्कादायक आरोप केला.