Suyash Tilak :  ‘मुलांच्या हातात मोबाईल देताय तर, किमान इतकं करा’ सुयश टिळकचा पालकांना सल्ला

Suyash Tilak Instagram Video : पालकांच्या याच सवयीवर अभिनेता सुरेश टिळक यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याने एका हॉटेलमध्ये आलेला अनुभव सांगितला आहे.
Suyash Tilak
Suyash Tilak esakal
Updated on

Parenting Tips :

आज-काल लहान बाळ किंवा आठ दहा वर्षाचा मुलगा रडू लागला की, पालक त्याला मोबाईल देऊन गप्प बसवतात. मुलांच्या हातात मोबाईल दिला की मुलं न रडता तासंतास एका जागेवर बसतात. त्यामुळे पालकांना मोकळेपणाने काम करता येते.  

पालकांच्या याच सवयीवर अभिनेता सुरेश टिळक यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याने  एका हॉटेलमध्ये आलेला अनुभव सांगितला आहे. त्याचबरोबर पालकांना एक लाख मोलाचा सल्ला दिला आहे. या व्हिडिओत लहान मुलांना मोबाईल देण आणि मुलांना कोणत्या वयात काय पहायला दिलं जातं यावर सुयशने प्रकाश टाकला आहे.

Suyash Tilak
Parenting Tips : मुलांच्या परीक्षा संपल्या?अशा पद्धतीने जोपासा त्यांचे छंद, मुलांचे रमेल मन

सुयश असे म्हणतो की, मी रेस्टॉरंटला गेलो होतो. आणि तिथे माझ्या शेजारच्या टेबलवर एक चांगली फॅमिली बसली होती. ज्यामध्ये एक लहान तीन चार वर्षाची मुलगी होती. ती मुलगी खूप धिंगाणा घालत होती. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिला मोबाईल वरती मस्त मोठ्या आवाजात एक कार्टून लावून दिले होते.

त्या मोठ्या आवाजात लावलेल्या कार्टूनचे काही डायलॉग माझ्या कानावर पडले. ते ऐकून मला धक्का बसला.

Suyash Tilak
Parents Bonding with Child : आजच्या काळात पालकत्वाची शैली आणि सकारात्मक पालकत्व खूप महत्वाचे ; डॉ. मलिहा साबळे

ते डायलॉग असे होते की, दोन मुलं असतात त्या कार्टूनमध्ये आणि एक लहान मुलगी असते. त्यातला एक मुलगा त्या मुलीला असं म्हणतो

‘तुम कितनी क्युट हो क्या मे तुम्हे दीदी कह सकता हु, त्यावर त्याचा मित्र त्याला मागणं मारतो आणि म्हणतो, क्या बोल रहा है, तू तो इसे प्रपोज करणे आया है,

त्यावर तो पहिला मुलगा म्हणतो की, मै तुम्हे प्यार से डर्लिंग बुला सकता हु, त्यावर ती मुलगी हसते आणि म्हणते, तूम कितने क्यूट हो.

त्यावर पुन्हा तो दुसरा मुलगा म्हणतो की, वा भाई तुम्हारी तो निकल पडी!

Suyash Tilak
Parenting Tips : मुलांच्या एकटे राहण्याच्या मानसिकतेला समजून घेण्यासाठी कोरियन पालकांनी शोधलाय नवा फंडा, जाणून घ्या

सुयश सांगतो की, पालकांनी काम सोप्पे व्हावीत म्हणून मुलांना मोबाईल द्यावा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण मुलं मोबाईलवर काय पाहतात याकडे तरी लक्ष्य ठेवावे. कारण, आजकाल मोबाईल्सवर अडल्ट कंटेंट सहज उपलब्ध आहे. त्याच्या लहान मुलांवर काय परिणाम होतोय हे पाहणं गरजेचं आहे.

अशाच कार्टून कोण बनवतोय, असा सवालही सुयशने उपस्थित केला आहे. आणि दुसरं म्हणजे अशा पद्धतीचे कार्टून्स कोण बनवतं आहे याकडेही लक्ष द्यायला हवं. कारण, लहान मुलांनी काहीतरी शिकता यावं किंवा त्यांचे मनोरंजन व्हावे असे कार्टून्स नक्कीच पहावेत. पण कोवळ्या वयात मुलांच्या कानावर हे कसले डायलॉग पडताहेत हे नक्कीच पालकांनी पहावं.  

या व्हिडिओवर अनेक युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. त्यामध्ये आमच्या काळात तर मोबाईल दूरच होते, तर, काहींनी लहान मुल कसे बोलतात अन् कशा शिव्या देतात यावरही कमेंट्स केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.