लेखक व दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका व निर्माती मधुगंधा कुलकर्णी या पती-पत्नीने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये उत्तमोत्तम चित्रपट केले आहेत. त्यांच्या चित्रपटांना चांगले यशदेखील मिळाले आहे. त्यांनी बनविलेल्या ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’ आणि ‘वाळवी’ या तीन मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.