IC814 The Kandahar Hijack: प्रदर्शन थांबवा ! नेटफ्लिक्स विरोधात दिल्ली हायकोर्टात दाखल केली जनहित याचिका

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या IC814 या वेबसिरीजविरोधात हिंदू सेनेच्या अध्यक्षांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली असून या वेबसिरीजवर बंदी करण्याची मागणी केली आहे.
IC814 The Kandahar Hijack
IC814 The Kandahar HijackSakal
Updated on

IC814 The Kandahar Hijack: अभिनेता विजय वर्माची आगामी वेबसिरीज IC814 कंदहार हायजॅक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या वेबसिरीजविरोधात दिल्ली हायकोर्टात सोमवारी 2 सप्टेंबर 2024 ला याचिका दाखल करण्यात आली. कंदहार घटनेतील दहशतवाद्यांची नावं बदलून त्यांची ओळख लपवली या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या सिरीजमध्ये विमान हायजॅक करणाऱ्या दहशतवाद्यांची नाव हिंदू दाखवण्यात आली आहेत. त्यातील दोन दहशतवाद्यांची नावं भोला आणि शंकर अशी अनुक्रमे आहेत. भगवान शंकराच्या नावावरून ही नावं असल्याने हिंदूंच्या भावना दुखावल्याचं या याचिकेमध्ये म्हटलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.