सध्या ‘फुलवंती’ चित्रपट आणि त्यातील गाण्यांची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातील प्रदर्शित झालेल्या गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली असताना ‘भो शंभो’ हे नवे गाणे रसिकांच्या भेटीला आले आहे. नृत्यदेवता म्हणून नटराज या रूपात शिवाचे महत्त्व आहे. .शिवाने प्रथम नृत्याचा प्रारंभ केला अशी भारतीय परंपरेतील धारणा आहे. नृत्यमग्न अवस्थेतल्या श्री शिवशंकरांना नटेश, नटेश्वर व नर्तेश्वर असेही म्हटले जाते. भारतीय अभिजात संगीत आणि शास्त्रीय भरतनाट्यम् नृत्य यांचा अद्भुत संगम यात पाहायला मिळणार आहे. शृंगार, वीर, करुण, हास्य, रौद्र, भयानक, अद्भुत आणि शांत असे वेगवेगळे रस दाखविताना नृत्य आणि पखवाजाचा रंजक सामना या गाण्यातून पाहायला मिळणार आहे. अप्रतिम अभिनय व नृत्याविष्कार असणाऱ्या या चित्रपटाने नृत्य व मानवी भावना यांचा अनोखा संगम दाखवला आहे. पाहा गाणं.विश्वजित जोशी यांनी लिहिलेले हे गाणे राहुल देशपांडे आणि बेला शेंडे यांनी स्वरबद्ध केलेले आहे. संगीतसाज अविनाश-विश्वजित यांनी चढविला आहे.हेही वाचा.Ekta Kapoor: निर्माती एकता कपूरला ते प्रकरण पडलं चांगलाच महागात, विरोधात गुन्हा दाखल .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.