Ashok Saraf : 'ही' आहे अशोक मामांची लाडकी मराठी मालिका ; मामांकडून शाबासकी मिळाल्यावर अभिनेत्री म्हणाली...

Ashok Saraf's Favorite Serial : सगळ्यांचे लाडके अशोक मामा म्हणजेच अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या लाडक्या मराठी मालिकेतल्या कलाकारांचं कौतुक केलं.
Ashok Saraf
Ashok SarafEsakal
Updated on

Rasika & Indraneil : सध्या मराठी मालिकविश्वातील अनेक मालिका गाजत आहेत. वेगवेगळे विषय, कथानक यांची भुरळ प्रेक्षकवर्गालाही पडलीये. कलर्स मराठीवरील पिरतीचा वणवा उरी पेटला ही प्रेक्षकांची लाडकी मालिका. रसिका वखारकर आणि इंद्रनील कामत यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. इतकंच नाही तर ही मालिका मराठी सिनेविश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचीही लाडकी मालिका आहे.

नुकतंच या मालिकेतील कलाकार अशोक सराफ यांच्या घरी त्यांना भेटायला आले होते. यावेळी अशोक यांनी या मालिकेतील दोन्ही मुख्य कलाकारांचं रसिका आणि इंद्रनीलचं भरभरून कौतुक केलं आणि त्यांच्याबरोबर फोटोही काढले. सोशल मिडीयावर याबाबत रसिका आणि इंद्रनीलने खास पोस्ट शेअर केली.

रसिकाची पोस्ट

रसिकाने तिच्या पोस्टमध्ये म्हंटलं कि,"मी कधीच सीरियल पाहत नाही.. पण तुमची सीरियल मी न चुकता रोज बघतो - अशोक सराफ

बास काय हवंय अजून? काल त्यांना पहिल्यांदा भेटण्याचा, त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आणि इतकंच नाही तर त्यांच्यासोबत आमच्या मालिकेचा एपिसोड बघण्याचा योग आला.

अविस्मरणीय दिवस!

निवेदिता ताई आमचं स्वागत केल्याबद्दल तुमचे खूप आभार. आणि हे सगळं घडून आलं ते तेजश्रीमुळे. तुझेही खूप आभार."

इंद्रनीलची पोस्ट

तर अर्जुनची भूमिका साकारणाऱ्या इंद्रनीलने त्याच्या पोस्टमध्ये म्हंटलं कि,"स्वप्न सत्यात उतरल्याचा हा क्षण!

मराठी चित्रपटसृष्टीचे महानायक.
मी स्वामींचे आभार मानेन की मला हे अद्भुत अनुभवण्याची संधी मिळाली. त्यांच्या कलेप्रती असलेला आदर आणि कृतज्ञता शब्दात मांडणं खरंच कठीण आहे. ज्यांना लहानपणापासून पहात आलो त्यांचा सहवास लाभला, एक कलाकार म्हणून हे खूप प्रेरणादायी आहे. मी कधी विचार ही केला न्हवता की त्यांना, ‘अशोक सराफ‘ सरांना, इतक्या जवळून अनुभवता येईल. त्यांचा जो काही सहवास मिळाला त्यात फक्त त्यांच्याकडे बघत रहावं असच वाटत होतं. माझ्या आयुष्यातला हा सर्वोत्तम क्षण आहे. तुम्हाला माहितीये का, ते आम्हाला म्हणाले, मला तुमचं काम आणि तुमची मालिका आवडते!!! बास्स, अजून काय हवं 🤍

निवेदिता ताई तुम्ही खूप आपलसं करून घेतलत. तुमच्याकडून मायेचा अनुभव मिळणं खूप विशेष आहे.
हे सगळं जुळून आलं तेजश्री प्रधान ह्यांच्यामुळे 

तळटीप: माझं ब्लड प्रेशर अजूनही नॉर्मल ला नाही आलंय :)"

दरम्यान, अशोक सराफ यांना ही मालिका खूप आवडत असल्यामुळे तेजश्री या कलाकारांना अशोक यांच्या भेटीसाठी घरी घेऊन आली असावी असा अंदाज आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत या सगळ्या कलाकारांचं कौतुक केलं आणि अशोक सराफ यांच्याकडून शाबासकी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे असं म्हंटल.

Ashok Saraf
Ashok Saraf: अशोक मामांच्या घरावर लावलेल्या नेमप्लेटनं वेधलं लक्ष; फोटो शेअर करत सुनील बर्वे म्हणाले, "एकदा खात्रीच करून घेतली..."

कलर्स मराठीवर सुरु असलेली पिरतीचा वणवा उरी पेटला या मालिकेत सावी आणि अर्जुनची गोष्ट पाहायला मिळत असून सत्तेसाठी सुरु असलेली चढाओढ आणि त्यात होरपळणारं सावी-अर्जुनचं प्रेम यावर आधारित ही मालिका आहे.

Ashok Saraf
Pirticha Vanva Uri Petla: बंद करा सिरियल! कलर्स मराठीच्या नव्या मालिकेवर प्रेक्षक भडकले..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.