नवी दिल्ली : चित्रपटात काम करणे हे राजकारणाच्या तुलनेत सोपे असून मला अठरा वर्षांपूर्वीच राजकारणात येण्याची ऑफर मिळाली होती, असे मंडीच्या नवनिर्वाचित खासदार, अभिनेत्री कंगना राणावत यांनी म्हटले आहे. पर्दापणाचा ‘गँगस्टर’ चित्रपटानंतर राजकारणात येण्याची ऑफर होती, मात्र मी तेव्हा तयार नव्हते, असेही त्या म्हणाल्या. राजकारण आणि कला क्षेत्र यात ताळमेळ ठेवण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी नमूद केले. (Politics is harder than film says MP Kangana Ranaut)
'द हिमाचल पॉडकास्ट'शी बोलताना कंगना यांनी राजकारणातील प्रवेशाबाबत स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या, माझ्या कुटुंबीयांस स्थानिक नेत्यांनी राजकीय प्रवेशाबाबत अनेकदा संपर्क साधला. अर्थात मला राजकारणात प्रवेश देण्याबाबत ऑफर देण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. गँगस्टर चित्रपटानंतर मला तत्काळ निवडणुकीचे तिकीट देण्याची ऑफर आली. माझे आजोबा आमदार होते. त्यामुळे माझे कुटुंबीय राजकीय क्षेत्रात वावरलेले असल्याने त्याचा थोडाफार अनुभव होता.
माझ्या वडिलांना देखील ऑफर आली होती. माझी बहिण रंगोलीवर ॲसिड हल्ला झाला तेव्हा तिला देखील राजकारणात प्रवेश देण्याची ऑफर आली होती. २०१९ मध्ये मला पुन्हा संपर्क करण्यात आला. मी तयार झाले नसते तर मला एवढा त्रास सहन करावा लागला नसता. राजकारणाकडे मी ब्रेकसारखे पाहत नाही. हा खूप कठीण निर्णय होता आणि त्यासाठी मी तयार आहे. माझ्या मते, मला ईश्वराने मला संधी दिली आणि मंडीच्या जनतेने पाठबळ दिले.
भ्रष्ट लोकांपासून आपला बचाव व्हावा असे मंडीच्या लोकांना वाटते आणि मी त्यांना निराश करणार नाही. राजकारण आणि अभिनय क्षेत्रात कसा ताळमेळ साधणार, याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, चित्रपट क्षेत्रात कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माती म्हणून भूमिका बजावते. याचप्रमाणे राजकीय कारकिर्दीत देखील माझ्याकडून शक्य तेवढे प्रयत्न करीन. अर्थात चित्रपटात काम करणे हे राजकारण करण्यापेक्षा सोपे आहे. राजकारणात तुलनेने बरीच मेहनत करावी लागते.
राजकारणातील वाटचाल डॉक्टरासारखीच कठीण असते, तेथे केवळ अडचणीत असलेले लोक तुम्हाला भेटतात. तुम्ही चित्रपट पाहण्यासाठी जाता, तेव्हा मानसिक ताण हलका करता. परंतु राजकारणात तसे नसते.दरम्यान, भाजपच्या उमेदवार कंगना राणावत यांनी मंडी लोकसभा निवडणूक सुमारे ७४, ७५५ मतांनी जिंकली. त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांना पराभूत केले. या विजयानंतर त्या चंडीगडला गेल्या असता तेथे विमानतळावर सीआयएसएफच्या महिला अधिकाऱ्याने त्यांना थप्पड लगावली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.