Marathi Entertainment News : मराठीमध्ये विपुल साहित्यसंपदा आहे आणि त्या साहित्यकृतींवर आधारित आतापर्यंत अनेक कलाकृती निर्माण झाल्या आहेत. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांची अशीच एक अलौकिक आणि अनमोल अशी साहित्यकृती म्हणजे ‘फुलवंती’. पेशवाईच्या अलौकिक काळातील एका स्वाभिमानी मराठी नर्तिकेची अर्थात फुलवंतीची ही कहाणी.