Celebrity Vatpaurnima 2024 : 'प्रत्येक जन्मासाठी तूच पाहिजेस' म्हणत प्रथमेशच्या रिअल लाईफ प्राजुने साजरी केली पहिली वटपौर्णिमा ; व्हिडिओची होतेय चर्चा

Prathamesh Parab & Kshiteeja Ghosalkar Vatpaurnima : अभिनेता प्रथमेश परबची बायको क्षितिजाने लग्नानंतर पहिल्यांदा वटपौर्णिमा साजरी केली. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Prathamesh Parab & Kshiteeja Ghosalkar
Prathamesh Parab & Kshiteeja Ghosalkar Esakal

Vatpaurnima 2024 : आज सगळीकडेच वटपौर्णिमा सगळ्या सुवासिनी साजऱ्या करत आहेत. पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रत्येक सुवासिनी करत असलेली प्रार्थना आणि त्यासाठी करत असलेलं व्रत यांची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. वटपौर्णिमेचा उत्साह मराठी मनोरंजनविश्वातही पहायाला मिळतोय. नुकतीच विवाहबंधनात अडकलेली जोडी प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर या जोडीने त्यांची पहिली वटपौर्णिमा थाटात साजरी केली. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

क्षितिजाची वटपौर्णिमा चर्चेत

प्रथमेशची बायको क्षितिजाने तिच्या पहिल्या वटपौर्णिमेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये क्षितिजा वडाची यथासांग पूजा करताना दिसत असून वडाला फेऱ्या घालताना दिसत आहे. तर प्रथमेशही यावेळी उपस्थित होता आणि त्या दोघांनी गुलाबी रंगाचे सारखे कपडे घातले होते. त्यांचं हे ट्विनिंग सगळ्यांना खूप आवडलं. तर तिने दिलेलं कॅप्शनही सगळ्यांना आवडलं. तिने लिहिलं,"फक्त सात जन्मासाठी
प्रत्येक जन्मासाठी
तूच पाहिजेस प्रथमेश परब

वडाच्या झाडासारखे आपले नाते दीर्घायुषी असावे😘😘
जन्मोजन्मी फक्त तुझीच सोबत असावी... ❤️❤️
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा😘❤️
.
.
.
सौ. क्षितिजा प्रथमेश परब♥️
"

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

प्रथमेशने क्षितिजाच्या या व्हिडिओवर हार्टचे इमोजी कमेंट्समध्ये शेअर केले आहेत. तर युझर्सनी या जोडीचं कमेंट्समध्ये कौतुक केलं आणि ही जोडी त्यांना खूप आवडत असल्याचं म्हंटलं. तर अनेक युजर्सनी या जोडीला शुभाशीर्वाद दिले.

लग्नाचा व्हिडीओ चर्चेत

प्रथमेश आणि क्षितिजाने २४ फेब्रुवारी २०२४ मध्ये या जोडीने लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यांचे मित्रमंडळी, कुटुंब यांच्या उपस्थितीत या जोडीने लग्न केलं. सगळ्यांना त्यांच्या लग्नाचे फोटो खूप आवडले.

Prathamesh Parab & Kshiteeja Ghosalkar
Prathamesh Parab: प्रथमेशचा 'लग्नवाला प्यार' आणि क्षितिजाचं खास मंगळसूत्र; प्रतिजाच्या लग्न सोहळ्याचा खास व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियामुळे जमली जोडी

प्रथमेश आणि क्षितिजा यांची ओळख सोशल मीडियामुळे झाली. क्षितीजाच्या फोटोशुटचं प्रथमेशने तिला मेसेज करून कौतुक केलं. तिथून त्यांचं बोलणं सुरु झालं आणि पुढे या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि काही काळाच्या डेटिंगनंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. क्षितिजा ही मॉडेलिंग करत असून ती कोटक एज्युकेशन फाउंडेशनमध्ये काम करते.

Prathamesh Parab & Kshiteeja Ghosalkar
Marathi Serial Vatpaurnima: वटपौर्णिमेच्या निमित्ताने एकत्र आल्या 'सावित्री', मराठी मालिकांमधील कलाकारांची वटपौर्णिमा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com