Prathamesh Parab : लेक एवढा मोठा स्टार असून प्रथमेशचे वडील अजूनही करतात हे काम ; "घरची परिस्थिती हलाखीची तरीही..."

Prathamesh Parab shared his father journey : अभिनेता प्रथमेश परबने त्याचा लहानपणीचा चाळीतील अनुभव शेअर केला. त्याचे वडील मुलगा स्टार असूनही अजून नोकरी करतात असं त्याने शेअर केलं.
Prathamesh Parab
Prathamesh ParabEsakal
Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स हे सामान्य कुटूंबातून आले आहेत. असाच एक मध्यमवर्गीय कुटूंबातून आलेला मुलगा म्हणजे प्रथमेश परब. बालक पालक, टाईमपास, दृश्यम यांसारख्या सिनेमातून आपल्या दमदार अभिनयाने त्याने सगळ्यांची मनं जिंकली. पण तुम्हाला माहितीये का ? प्रथमेशचे वडील अजूनही नोकरी करतात.

नुकतंच आरपार ऑनलाईन या चॅनेलला प्रथमेशने मुलाखत दिली. यावेळी तो त्याच चाळीतील आयुष्य, घरातील माणसं, मराठी इंडस्ट्री यावर त्याने भरभरून भाष्य केलं. यावेळी त्याने त्याचे वडील अजून का नोकरी करतात यामागचं कारण त्याने उघड केलं.

प्रथमेश म्हणाला,"आजही माझे वडील अजूनही नोकरी करतात. ते हाऊसकिपींगचं काम करतात. ते अजूनही सायकल घेऊन कामाला जातात. सुरुवातीला मला वाटायचं त्यांनी नोकरी करू नये. आता आराम करावा. असं मला वाटायचं. पण मला आता कळतंय कि त्यांना काम करायला आवडतं. ते म्हणतात घरी राहिलो तर माझं डोकं खराब होईल. ते असं का म्हणतात याचा अर्थ मला कळतोय त्यामुळे मी आता त्यांना काही बोलत नाही.

ते जेव्हा घरी असतात तेव्हा ते क्षितिजाबरोबर घरात झाडं लावत असतात. ते दोघेही सगळीकडे झाडं लावतात. त्यांना या गोष्टीची आवड आहे."

लहानपणीविषयी सांगतात तो म्हणाला कि,"लहानपणी आमची परिस्थिती खूप सामान्य होती. महिन्याच्या अखेरीस पैसे संपलेले असायचे. बाबा कुठूनतरी पैसे मागून आणायचे. असं घर चालायचं. आम्ही कधीच थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहायला नाही. कारण आई-बाबांनी कधी दाखवलाच नाही. त्यामुळे सिनेमा हा टीव्हीवरच लागतो हे इतकंच आम्हाला माहित होतं."

प्रथमेशचा ताजा खबर ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. भुवन बाम, श्रिया पिळगावकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. डिझने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसिरीजवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Prathamesh Parab
Apurva Nemlekar: "तुला गमावण्याची वेदना आयुष्यभर...", भावाच्या वाढदिवशी अपूर्वाची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.