Dhadak 2 : करणने दिलं प्रेक्षकांना सरप्राईज ; धडक २ ची घोषणा आणि 'या' कलाकारांची मुख्य भूमिका

Dhadak 2 Motion Poster is out : निर्माता करण जोहरने 'धडक २' चं पोस्टर शेअर करत प्रेक्षकांना सरप्राइज दिलं. या सिनेमाच्या कास्टविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.
Dhadak 2
Dhadak 2Esakal
Updated on

जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांची मुख्य भूमिका असलेला सैराट सिनेमाचा रिमेक धडक सैराट इतकी चमक दाखवू शकला नसला तरीही बऱ्यापैकी गाजला होता. जान्हवी आणि ईशानने या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत.

आता नुकतीच निर्माता करण जोहरने धडक २ ची घोषणा केली.

करणची पोस्ट आणि धडकचं मोशन पोस्टर

करणने सोशल मीडियावर धडक २चं मोशन पोस्टर शेअर केलं. या पोस्टरमध्ये भिंतीवर प्रेमाचं वर्णन करणारी वाक्य लिहिलेली दिसत असून हळूहळू सिनेमातील मुख्य कलाकारांचे चेहरे रिव्हील होतात आणि बॅकग्राउण्ड सिद्धांत आणि तृप्तीच्या आवाजातील संवाद ऐकू येत आहेत. "जे स्वप्न विधी तू पाहतेयस त्यात माझी कोणतीच जागा नाहीये" असं सिद्धांत म्हणतोय तर त्यावर तृप्ती "तर मग तूच सांग निलेश या भावनांचं काय करू?" असा प्रश्न विचारतेय. यावरून निलेश आणि विधी या जोडीची लव्हस्टोरी या सिनेमात पाहायला मिळणार आहे असं दिसतंय.

करणने या पोस्टरला "यह कहानी है थोड़ी अलग क्यूंकि एक था राजा, एक थी रानी - जात अलग थी...ख़तम कहानी
Presenting Dhadak 2 starring Siddhant Chaturvedi & Triptii Dimri. Directed by Shazia Iqbal." असं कॅप्शन दिलं आहे.

अनेकांनी पोस्टरवर कमेंट ते हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत असं म्हंटलं. सिनेमाच्या सिक्वेलमधील ही नवी जोडीही प्रेक्षकांना पसंत पडलीये. आता धडक २ मध्ये नेमकी कोणती लव्हस्टोरी पाहायला मिळणार हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

शाझिया इकबाल या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. २२ नोव्हेंबर २०२४ ला हा सिनेमा रिलीज होतोय. करण जोहरची धर्मा प्रॉडक्शन ही कंपनी या सिनेमाची निर्मिती करतेय.

Dhadak 2
Trupti Dimri Divorce: कला फेम अभिनेत्री तृप्ती डिमरीचा ब्रेकअप? अनुष्का शर्माच्या भावाशी रिलेशनशीप

या आधीही हा धडक सिनेमाचा सिक्वेल येत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या पण करणने असा कोणताही सिनेमा येणार नसल्याचं काही महिन्यांपूर्वी स्पष्ट केलं होतं त्यामुळे सिनेमाच्या घोषणेमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

पिंकविलाच्या हवाल्याने सूत्रांनी दिलेल्यामाहितीनुसार,"धडक ही प्रेमासाठी जगाविरुद्ध लढणाऱ्या जोडीची कथा आहे. त्यामुळे तितकंच मजबूत कथानक सिनेनिर्मात्याना हवं होतं. जेव्हा त्यांना या कथेत ती ताकद दिसली तेव्हा त्यांनी या सिनेमाची निर्मिती करण्यासाठी होकार दिला." असं सांगितलं.

Dhadak 2
Dhadak 2: सैराटच्या रिमेकचा सिक्वेल येणार? करण जोहर म्हणतोय,..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.