Karan Aujla Video: तौबा-तौबा... पंजाबी गायकावर लंडनमध्ये हल्ला, प्रेक्षकाने फेकलेला बूट थेट चेहऱ्यावर आदळला

Karan Aujla Punjabi Singer: हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, एक युजर हे प्रकरण स्क्रिप्टेड असल्याचे म्हणत आहे तर काही लोक गायकासोबत घडलेल्या या घटनेबद्दल खेद व्यक्त करत आहेत.
Karan Aujla London Viral Video
Karan Aujla London Viral VideoEsakal
Updated on

Karan Aujla London Viral Video: 'बॅड न्यूज' चित्रपटातील तौबा-तौबा हे लोकप्रिय गाणे गाणारा पंजाबी गायक करण औजला सध्या यूके दौऱ्यावर आहे. लंडनमध्ये त्यांचा कॉन्सर्ट सुरू होता. यावेळी प्रेक्षकांमधून कोणतरी कोणीतरी बूट फेकला. याननंतर संतापलेल्या करण औजलाने स्टेजवरूनच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर बूट फेकणाऱ्याला स्टेजवर येण्याचे आव्हानही दिले.

करण औजला लंडन शो दरम्यान स्टेजवर परफॉर्म करत होता. यादरम्यान डाव्या बाजूने एक पांढरा बुट स्टेजच्या दिशेने आला आणि थेट करण औजलाच्या चेहऱ्यावर आदळला. यानंतर करण औजला संतापला.

या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लाइव्ह शो दरम्यान, गर्दीतून कोणीतरी बूट फेकतो आणि तो करण औजलाच्या चेहऱ्याला लागतो. बुटाचा फटका लागल्यानंतर तो खूप अस्वस्थ होतो आणि गाणे थांबवतो, स्टेजवरून बूट खाली फेकतो आणि नंतर फेकणाऱ्याला आव्हान देत म्हणतो, "हिंमत असेल तर स्टेजवर या. आणि लढा."

या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, एक युजर हे प्रकरण स्क्रिप्टेड असल्याचे म्हणत आहे तर काही लोक गायकासोबत घडलेल्या या घटनेबद्दल खेद व्यक्त करत आहेत.

Karan Aujla London Viral Video
BB Marathi 5 Wild Card Entry: बिग बॉसच्या घरात येणार रांगडा मर्द गडी; झाली पहिली वाइल्ड कार्ड एंट्री, वाचा कोण आहे तो

करण औजला हा पंजाब फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध गायक आहे. करणने आतापर्यंत अनेक हिट पंजाबी गाणी दिली आहेत. त्याचबरोबर करणचे 'तौबा तौबा' हे बॉलिवूड गाणेही चाहत्यांना खूप आवडले आहे.

'तौबा तौबा' या गाण्याला यूट्यूबवर आतापर्यंत 241 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. आताही हे गाणे खूप पसंत केले जात आहे.

Karan Aujla London Viral Video
Radhika Apte : राधिकाने एका अभिनेत्याला मारली होती थप्पड; एका टीव्ही शोदरम्यान याचा खुलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.