Radhika Merchant: हिऱ्यांच्या दुनियेत जगणारी राधिका दिसली गनमेटल साडीत; Photo Viral

अंबानी कुटुंबाच्या धाकट्या सुनेने पुन्हा एकदा सिद्ध केले की फॅशनच्या बाबतीत तिच्यापुढे कोणीही टिकू शकत नाही.
Radhika Merchant In Black Chainmail Pattern Saree Is Perfect Inspiration For Your Next Cocktail Party
Radhika Merchant In Black Chainmail Pattern Saree Is Perfect Inspiration For Your Next Cocktail Party
Updated on

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा संगीत सोहळा पार पडला असला तरी त्याची चर्चा काही थांबलेली नाही. अनंत आणि राधिकाचे काही अनसिन फोटो सध्या समोर येत आहेत. सोन्याने भरलेले जॅकेट असो किंवा राधिकाचा क्रिस्टल लेहेंगा, प्रत्येकजण त्यांच्या लुकबद्दल बोलताना दिसत आहे. प्रत्येक सोहळ्यातील राधिकाचा लुक हा सर्वांना घायाळ करताना दिसत आहे. अशातच संगीतनंतर झालेल्या पार्टीतील तिचा लुक समोर आला आहे. तिच्या या लुकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Radhika Merchant In Black Chainmail Pattern Saree Is Perfect Inspiration For Your Next Cocktail Party
Anant Ambani: संगीत सोहळ्यात सोन्याने मढले अनंत अंबानी; जॅकेटची किंमत पाहून धक्का बसेल?

संगीत सोहळ्याला राधिकाने अनंत अंबानींसोबत अनंतसोबत लेहेंगा-चोली घालून प्रवेश केला. नंतर तिनं साडी परिधान करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. तिचा साडी लुक पाहून सर्वांची नजर तिच्यावरच खिळली होती. यावेळी अंबानी कुटुंबाच्या धाकट्या सुनेने पुन्हा एकदा सिद्ध केले की फॅशनच्या बाबतीत तिच्यापुढे कोणीही टिकू शकत नाही.

Radhika Merchant In Black Chainmail Pattern Saree Is Perfect Inspiration For Your Next Cocktail Party
Anant-Radhika Sangeet: संगीत समारंभात अनंत-राधिकाचा शोभून दिसला जोडा

राधिकाने संगीतात अबू जानी संदीप खोसला यांचा क्रिस्टल लेहेंगा परिधान केला होता, तर आफ्टर पार्टीसाठी या हसीनाने मनीष मल्होत्राची साडी निवडली होती. ना ती साडी हिऱ्याची होती ना ती सोन्याने मढलेली होती. राधिकाने आफ्टर पार्टीसाठी निवडलेली साडीचा पॅटर्न हटके होता. चेनमेल पॅटर्न होता. ही कस्टम स्टेटमेंट साडी मेटल प्लेट्सची बनलेली होती, मेटल रिंगसह जोडलेली होती. सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट रिया कपूरने राधिकाचा हा ग्लॅमरस लुक केला होता.

राधिकाने खास तिच्यासाठी डिझाइन केलेल्या या काळ्या चमकदार चेनमेल पॅटर्नच्या साडीमध्ये ग्लॅमरचा टच जोडला. तिने मॅचिंग ऑफ-शोल्डर कॉर्सेट ब्लाउज या साडीवर परिधान केलं आहे. साडीला दिलेला हा वेस्टर्न टच पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()