राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त प्राजक्तानं शेअर केली खास पोस्ट; म्हणाली, "फोटोत दिसताय त्याप्रमाणे..."
Raj Thackeraysakal

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त प्राजक्तानं शेअर केली खास पोस्ट; म्हणाली, "फोटोत दिसताय त्याप्रमाणे..."

Prajakta Mali: प्राजक्तानं या पोस्टच्या माध्यामातून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Prajakta Mali: आज (14 जून) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतीच अभिनेत्री प्राजक्ता माळीनं (Prajakta Mali) देखील राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे.

प्राजक्ताची पोस्ट

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये प्राजक्तानं तिच्या ‘प्राजक्तराज' या ब्रँडच्या लाँच सोहळ्यातील काही फोटो शेअर केले. या फोटोंना तिनं कॅप्शन दिलं, "आदरणीय “आपणांस” वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा…राज ठाकरे जी..जे करण्याची इच्छा आहे, ते काम हातात यावं. काम करताना आनंद मिळावा. त्यातून समाधान लाभावं, ह्याच वाढदिवसानिमित्त माझ्याकडून व ‘प्राजक्तराज परिवाराकडून’ शुभकामना. #शुभेच्छा #अविरत #श्रीमंत, फोटोत दिसताय त्याप्रमाणे सदैव हसत रहा, प्रसन्न रहा.."

प्राजक्ताच्या ‘प्राजक्तराज' या ब्रँडच्या लाँचिंग सोहळ्याला राज ठाकरे आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी हजेरी लावली होती.

प्राजक्तानं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाचे ती सूत्रसंचालन करते. प्राजक्ताला जुळून येती रेशमी गाठी या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. प्राजक्तानं लकडाऊन, हंपी, पावनखिंड आणि वाय या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com