राजकुमार रावने आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. नुकताच प्रदर्शित झालेला ‘स्त्री २’ हा त्याचा आठशे कोटी रुपयांचा बॉक्स ऑफिस कलेक्शन करणारा पहिला चित्रपट आहे. अशातच राजकुमारचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कारण, या चित्रपटाच्या बंपर यशानंतर त्याने आपले मानधन ५ कोटी इतके वाढवल्याचे सांगितले जात आहे.