Bollywood Entertainment News : कायमच काही ना काही कारणांमुळे वादात राहणारी अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राखी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिला जामीन मिळवून देण्याची विनंती केली आहे. राखीने ती निर्दोष असल्याचं म्हटलं असून तिला तिच्या देशात परत यायचं आहे असं तिने म्हटलं आहे. तिला तिच्या आईच्या अस्थी आणायला जायचं असल्याचंही तिने सांगितलं.