Ram Charan: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकार आज बॉलिवूड प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यातील एक प्रसिद्ध चेहरा म्हणजे अभिनेता रामचरण. 'आरआरआर' या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर रामचरण फक्त भारतातच नाही तर सातासमुद्रापार लोकप्रिय झाला. त्याला सुपरस्टार ही पदवी मिळाली. मात्र त्याचे वडील चिरंजीवी हे पूर्वीपासूनच दाक्षिणात्य चित्रपट गाजवत आले आहेत. ते बॉलिवूड प्रेक्षकांमध्येही खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या चित्रपटांचे तर सगळेच चाहते आहेत. रामचरण आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवूनच यशस्वी झाला. मात्र असं असलं तरी वडिलांची एक शिकवण रामचरण आजही पाळतो.
नुकताच फादर्स डेच्या निमित्ताने राम चरणने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने आपल्या वडिलांबद्दल सांगितलं. त्याचं आणि त्याच्या वडिलांचं नातं नेमकं कसं आहे, त्याचे वडील घरी कसे वागतात याबद्दल त्याने भाष्य केलं. आपण वडिलांकडून काय शिकलो याबद्दल बोलताना राम चरण म्हणाला, 'माझ्या वडिलांचं कम्युनिकेशन स्किल उत्तम आहे. ते समोरच्याशी पटकन मैत्री करू शकतात. ते त्यांचं काम पूर्ण एकाग्रतेने करतात. शिवाय ते शिस्तप्रियदेखील आहेत. ते समाजासाठी एक उत्तम उदाहरण आहेत. ते मला सांगतात की तुम्ही किती मोठे सुपरस्टार आहात याने काहीच फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या आसपासच्या स्टाफची पूर्ण विनम्रतेने काळजी घेतली पाहिजे.'
राम चरण पुढे म्हणाला,'माझ्या वडिलांची अपेक्षा आहे की मी २४ तास शिस्तीने वागलं पाहिजे. कारण दिवस चांगला असो किंवा वाईट, शिस्त नेहमी उपयोगी येते. त्यांची ही शिकवण मी कायम लक्षात ठेवतो.' राम चरण आणि चिरंजीवी यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. त्यांची जोडी कायमच प्रेक्षकांच्या आवडीची राहिली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.