Ranbir Kapoor: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) मुख्य भूमिका असलेल्या 'रामायण' (Ramayana) या सिनेमाची. नितीश तिवारी यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असून या सिनेमाविषयीचे अपडेट्स जाणून घेण्यास खुप उत्सुक असतात. सिनेमाच्या शूटिंगला फिल्मसिटीमध्ये सुरुवात झाली आणि याचे लीक झालेले फोटोज सोशल मीडियावर चर्चेत होते. अभिनेता रणबीर कपूरने सुद्धा सिनेमासाठी जोरदार तयारी सुरु केलीये.
नुकतंच इन्स्टंट बॉलिवूड या इंस्टाग्राम पेजवर रणबीरचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात तो भगवान श्रीरामांची भूमिका साकारण्यासाठी घेत असलेलं फिटनेस ट्रेनिंग पाहायला मिळालं. त्याच्या या ट्रेनिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.
सोशल मीडियावरील रणबीरचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. यात रणबीर घेत असलेल्या मेहनतीचं अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून कौतुक केलं. इतकंच नाही तर रणबीरची लेक राहा आणि आलियासुद्धा त्याला सपोर्ट करण्यासाठी हजर होत्या. आलिया आणि रणबीरने एकत्र गिर्यारोहणसुद्धा केलं.
रणबीर सिनेमाच्या शूटिंगला कधी सुरुवात करणार ते अजून स्पष्ट झालं नाहीये. पण ईटाइम्सने दिलेल्या बातमीनुसार रणबीरचं पहिलं शेड्युल साठ दिवसांचं असेल. तर सिनेमाच्या दुसऱ्या शेड्युलपासून अभिनेता यशसुद्धा शूटिंगला सुरुवात करेल. पण याबाबत सिनेमाच्या टीमने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाहीये. या सिनेमाचं शूट लंडन आणि मुंबई या दोन ठिकाणी पार पडणार असल्याचं म्हंटलं जातंय.
काही दिवसांपूर्वी रामायण सिनेमाच्या सेटवरील फोटो सोशल मीडियावर लीक झाल्यामुळे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी सेटवर 'नो फोन पॉलिसी' नियम लागू केला. शूटिंग सुरू झाल्यावर अतिरिक्त कर्मचारी आणि क्रूनं सेटवरून बाहेर पडावे, असा नियम देखील नितेश तिवारी यांनी चित्रपटाच्या टीमसाठी बनवला आहे. रिपोर्टनुसार, फक्त आवश्यक कलाकार आणि तंत्रज्ञ सेटवर थांबू शकणार आहेत.
रणबीर या सिनेमात प्रभू रामांची भूमिका साकारणार असून साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत असेल. तर राजा दशरथाची भूमिका अरुण गोविल, कैकेयीच्या भूमिकेत अभिनेत्री लारा दत्ता काम करणार आहे. अभिनेता यश रावणाची भूमिका साकारणार असून अभिनेता सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार असल्याचं म्हंटल जातंय तर भरतच्या भूमिकेत मराठी अभिनेता आदिनाथ कोठारेची वर्णी लागलीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.