Anant Radhika Wedding: अनंतच्या वरातीत रणवीर- प्रियांकाचा कल्ला; निक भावोजींनाही शिकवल्या देसी स्टेप्स, नेटकरी म्हणतात-

Ranveer Singh Dance In Anant Ambani Wedding: अनंत अंबानीच्या वरातीत रणवीर सिंगचा बेभान डान्स पाहून सगळेच त्याचं कौतुक करत आहेत.
ranveer singh dance
ranveer singh dance sakal
Updated on

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचं आज १२ जुलै रोजी लग्न आहे. गेले कित्येक दिवस या लग्नासाठी सगळे उत्सुक होते. नववधू आणि वराला पाहण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. लवकरच लग्नविधींना सुरुवात होणार आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे मोठ्या थाटामाटात हा विवाह पार पडणार आहे. या,अंबानी कुटुंबाची विवाहस्थळी मोठ्या दिमाखात एंट्री झाली. अशातच आता अनंतच्या वरातीचे काही व्हिडिओ समोर येत आहेत. वरातीत अनेक बॉलिवूड कलाकार दिलखुलास पद्धतीने नाचत आहेत. त्यात सगळ्यात पहिला नंबर लागतोय तो अभिनेता रणवीर सिंग याचा.

अभिनेता रणवीर सिंग म्हटलं की एनर्जीचा बॉम्ब. ढोल ताशाच्या गजरात वरात अँटिलीयाहून निघाली होती. आता जिओ वर्ल्ड सेंटर येथे निरनिराळी गाणी वाजवण्यात येत आहेत. त्यावर बॉलिवूड कलाकार नृत्य करताना दिसत आहेत. त्यात रणवीर जबरदस्त एनर्जीने नाचताना दिसतोय. त्याच्यासोबत आहे त्याची जिवलग मैत्रीण प्रियांका चोप्रा. रणवीर एकटा नाचत नाहीये तर प्रियांकाचा पती म्हणजे निक जोनास यालाही देसी स्टेप्स शिकवताना दिसतोय. 'सपने मै मिलती हैं' या गाण्यावर रणवीर निक भाओजींसोबत ठुमके लागवताना दिसतोय. प्रियांका आणि रणवीर मिळून कल्ला करत आहेत.

तर एका व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी स्वतः येऊन प्रियांकाची गळाभेट घेतात. प्रियांका खास या लग्नासाठी पतीसोबत भारतात आली आहे. आता ती हे लग्न एन्जॉय करतेय. अनंतच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सगळ्यात नेटकऱ्यांना मात्र दीपिकाची आठवण येते आहेत. इथे रणवीर मस्त एन्जॉय करतोय आणि तिकडे दीपिका गप्प घरात बसली असेल असं म्हणत नेटकरी दीपिकाची आठवण काढत आहेत.

ranveer singh dance
Anant Radhika Wedding: भस्म, दुधाचा अभिषेक अन्... अंबानींच्या शिवशक्ती पूजेचा व्हिडिओ पाहून नेटकरी भारावले, म्हणतात- उगीच नाही देव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com