Viral Video: रवीना टंडनचा दारु पिऊन धिंगाणा? वृद्ध महिलेला मारहाण केल्याचा आरोप; व्हिडिओ होतोय व्हायरल

Raveena Tandon: शनिवारी (1 जून) रात्री मुंबईतील वांद्रे परिसरात काही लोकांना मारहाण केल्याचा आरोप रवीनावर करण्यात आला आहे.
Raveena Tandon
Raveena Tandonsakal
Updated on

Raveena Tandon: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) ही सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. शनिवारी (1 जून) रात्री मुंबईतील वांद्रे परिसरात काही लोकांना मारहाण केल्याचा आरोप रवीनावर करण्यात आला आहे. या प्रकरणी काही स्थानिकांनी रवीनाला घेरले आणि तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

रवीनावर गंभीर आरोप

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रवीनावर गंभीर आरोप करताना देखील दिसत आहे. तो व्यक्ती म्हणतो की, "मी वांद्रे येथे राहतो. माझी आई, बहिण आणि भाची या तिघी रवीना टंडनच्या घराजवळून येत होत्या. त्यावेळी रवीनाचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. त्या गाडीनं माझ्या आईला टक्कर दिली. त्या ड्रायव्हरनं माझ्या भाचीला मारलं, आईला मारलं. त्यानंतर रवीना टंडन ही दारुच्या नशेत आली. तिनं देखील माझ्या आईला मारलं. माझ्या आईच्या डोक्याला दुखापत झाली आहे. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो. पण इथे आमचं कुणी ऐकत नाहीये. आपण मांडवली करु, असं ते म्हणत आहेत."

"तुला तुरुंगात रात्र काढावी लागेल. माझ्या नाकातून रक्त येत आहे." असं व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक महिला रवीनाला म्हणताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ:

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रवीना ही लोकांना व्हिडीओ रेकॉर्ड न करण्याची विनंती करत आहे आणि स्थानिकांनी तिच्यावर हल्ला करत आहे. रवीना ही व्हिडीओमध्ये म्हणताना ऐकू येते, "धक्का मारू नका. कृपया मला मारू नका."

Raveena Tandon
Raveena Tandon: मुंबईतील चौकाला रवीना टंडनच्या वडिलांचं नाव; अभिनेत्रीनं शेअर केले खास फोटो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com