Reema Lagoo: 'हम आपके हैं कौन'च्या 'त्या' सीननंतर रडू लागलेल्या रीमा लागू; रेणुका यांना काढावी लागलेली समजूत

Reema Lagoo Birth Anniversary: अभिनेत्री रीमा लागू या 'हम आपके हैं कौन' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ढसा ढसा रडू लागल्या होत्या.
reema lagoo
reema lagoosakal

Reema Lagoo: अभिनेत्री रीमा लागू यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यांनी अनेक चित्रपटात मुख्य अभिनेत्याच्या आईची भूमिका साकारली. त्या बॉलिवूडच्या सगळ्यात ग्लॅमरस आई होत्या. त्या पडद्यावर जितक्या मायाळू होत्या तितक्याच खऱ्या आयुष्यातही प्रेमळ होत्या. यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी आजही प्रेक्षकांना ठाऊक नाहीत. त्यांनी फार लवकर प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यांच्या गाजलेल्या आईच्या भूमिकांपैकी एक म्हणजे 'हम आपके हैं कौन' या चित्रपटातील आईची. मात्र या शूटिंगदरम्यान त्या रडू लागल्या होत्या हे तुम्हाला ठाऊक आहे का?

reema lagoo
reema lagoosakal

आज २१ जून रोजी त्यांचा स्मृतिदिन आहे. रीमा यांनी 'हम आपके हैं कौन' या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे यांच्या आईची भूमिका साकारली होती. मात्र या चित्रपटातील एका सीननंतर त्या प्रचंड रडू लागल्या. तो होता रेणुका यांचा इस्पितळातील सीन. रेणुका जेव्हा मरतात तेव्हा रीमा खूप रडू लागलेल्या. रेणुका यांनी स्वतः त्यांची समजूत घातलेली. याबद्दल बोलताना रेणुका म्हणालेल्या, 'रीमाताई इतक्या त्यांच्या भूमिकेत शिरल्या होत्या की एका क्षणाला मी त्यांची मुलगीच आहे असं वाटून गेलं.'

रीमा यांची ती भूमिका

पुढे रेणुका म्हणाल्या, 'मी जेव्हा मरते तो सीन होताच कट म्हणताच त्या मेकअप रूममध्ये गेल्या आणि ढसा ढसा रडू लागल्या. त्या बराच वेळ रडत होत्या. त्या रडायच्या थांबतच नव्हत्या. शेवटी मी त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना मिठी मारली. मी त्यांना शांत करत म्हणाले, मी जिवंत आहे. मला काहीही झालेलं नाही. हे काही खऱ्या आयुष्यात घडलेलं नाही. शांत व्हा. त्या सीनमधून बाहेर येण्यासाठी त्यांना बराच वेळ लागला होता.' हा चित्रपट आजही कल्ट क्लासिक चित्रपटात गणला जातो. रीमा यांची ती भूमिका आजही तितकीच आपलीशी वाटते हेही तितकंच खरं.

reema lagoo
Kakuda: छोटा दरवाजा उघडा ठेवा नाहीतर... 'मुंज्या'नंतर आता 'ककुडा येणार भेटीला; ककुडा म्हणजे आहे तरी काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com