Rekha : अमिताभ यांच्याशी लग्नापूर्वी जया यांची होती रेखाशी खास दोस्ती ; 'या' नावाने मारायच्या हाक

Rekha Birthday Special : बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांचा आज वाढदिवस आहे. अमिताभ यांची दोघींच्या आयुष्यात एंट्री होण्यापूर्वी रेखा आणि जया खास मैत्रिणी होत्या. पण या मैत्रीत नेमकं काय बिनसलं जाणून घेऊया.
Rekha and Jaya bachchan
Rekha and Jaya bachchanEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांचा आज 10 ऑक्टोबर 2024 ला सत्तरावा वाढदिवस आहे. आपल्या अदांनी आणि भन्नाट अभिनयाने संपूर्ण बॉलिवूडला घायाळ करणाऱ्या रेखा यांचं आयुष्य कायमच गुंतागुंतीचं आणि वादग्रस्त राहिलं. त्यांचं दुखी बालपण, विस्कटलेले वैयक्तिक आयुष्य, त्यांची प्रेमप्रकरण, मोडलेली लग्न यामुळे रेखा कायमच विवादित राहिल्या. यातीलच एक कायम चर्चेत राहिलेलं प्रकरण म्हणजे अमिताभ आणि रेखा यांचं प्रेमप्रकरण. आजही या विषयावर कुणीही स्पष्टपणे बोललं नसलं तरीही त्यावर चर्चा चवीने होते. पण तुम्हाला माहितीये का ? अमिताभ आणि रेखा यांच्या या कथित अफेअर पूर्वी रेखा आणि जया या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या.

Rekha and Jaya bachchan
Jaya Bachchan Become ANGRY : अमिताभ यांचं नाव घेताच जया बच्चन राज्यसभा स्पीकरवर भडकल्या ; काय घडलं नेमकं ? पाहा Viral Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.