दर्शनला बळ्ळारी कारागृहात हलवण्यात येणार असल्याची माहिती कारागृह अधिकाऱ्यांना दिली आहे.
बंगळूर : खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला अभिनेता दर्शन (Actor Darshan) याच्या न्यायालयीन कोठडी नऊ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. त्याला कारागृहात शाही पाहुणचार मिळत असल्याने तो चर्चेत आला आहे. दरम्यान, त्याला बळ्ळारी कारागृहात हलवण्यात येणार आहे. दर्शन हा रेणुकास्वामी याच्या खून प्रकरणातील (Renukaswamy Murder Case) मुख्य आरोपी आहे.