Riteish Upcoming Project : अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीये. एक उत्तम अभिनेता, निर्माता आणि आता दिग्दर्शक म्हणून ओळखला जाणारा रितेश आता वेबविश्वात पदार्पण करतोय. त्याची 'पिल' नावाची वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येत असून या वेबसिरीजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला.
सोशल मीडियावर पिल (Pill Web Series) या वेब सिरिजच्या ट्रेलर शेअर करण्यात आला. औषधांची निर्मिती करणारी इंडस्ट्री, त्यातील भ्रष्टाचार, लोकांच्या जीवांशी चालणारा खेळ आणि त्यावर आळा घालण्यासाठी एक अधिकारी करत असलेली धडपड या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे.
रितेश या वेबसिरीजमध्ये डॉ. प्रकाश चौहान या मेडिसीन ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये काम करणाऱ्या मेडिसिन कंट्रोलर अधिकाऱ्याची भूमिका साकारतोय तर अभिनेते पवन मल्होत्रा यात औषध निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या बिझनेस टायकूनची भूमिका साकारत आहेत.
लोकांच्या जीवाशी खेळ होत असलेल्या औषधांची निर्मिती होतेय अशी खबर डॉ. प्रकाशला लागते आणि मग तो या भ्रष्टाचाराचा शोध कसा लावतो, एका घटनेमुळे त्याच आयुष्य कसं बदलतं, औषध निर्मिती क्षेत्रात घोटाळे कसे होतात यावर ही वेबसिरीज प्रकाश टाकत असून याचा ट्रेलर अतिशय उत्कंठावर्धक आहे.
एका प्रामाणिक सरकारी अधिकाऱ्याने एका बलाढ्य कंपनीच्या भ्रष्ट सीईओशी दिलेला लढा, न्यायालयीन खटल्यातील चुरस यांची गोष्ट या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळेल. सर्व्हेच्या नावाखाली काही पैशांच्या बदल्यात लोकांच्या जीवाशी औषध निर्मात्या कंपन्यांनी चालवलेला खेळ आणि त्याचे होणारे दुष्परिणाम, कंपनीचं प्रॉफिट वाढवण्यासाठी लोकांच्या जीवाशी चालणारा खेळ यावर सुद्धा ही वेबसिरीज भाष्य करणार आहे. ट्रेलरमधील रितेशच्या जबरदस्त अभिनयाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
१२ जुलै २०२४ पासून जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. राजकुमार गुप्ता यांनी वेबसिरीजचं लेखन-दिग्दर्शन केलं असून रॉनी स्क्रूवालाने या वेब सिरीजची निर्मिती केली आहे. रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि पवन मल्होत्रा (Pawan Malhotra) यांची या वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिका आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.