Sai Tamhankar: सई ताम्हणकर झाली उद्योजिका; सुरू केला ‘हा’ बिझनेस

वाढदिवसानिमित्त सईनं तिचा स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. सईनं तिचा स्वत:चा Merchandise ब्रँड लाँच केला आहे.
सकाळ
Sai Tamhankarsakal

Sai Tamhankar: काही दिवसापासून सई ताम्हणकर (Sai Tamhankar) तिच्या इंस्टाग्राम स्टोरी मधून वेगवेगळ्य पोस्ट शेअर करत होती. या पोस्ट पाहिल्यानंतर नेटकरी अंदाज लावत होते की, सई काहीतरी खास करणार आहे. काल (25 जून) सईचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त सईनं तिचा स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे.

2024 वर्ष सईसाठी अगदीच खास आहे. बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स आणि धमाकेदार काम करून सई चर्चेत राहिली. अशातच सईनं तिचा स्वत:चा Merchandise ब्रँड लाँच केला आहे.

सईने स्वतःच्या वाढिवसानिमित्त "मॅडम एस (madame S) हा Merchandise ब्रँड लाँच केला असून अगदीच हटके अस या ब्रँडच नाव आहे आणि त्याची गोष्ट देखील तितकीच भारी आहे. " क्वीन ऑफ स्यासी ट्यूड “ असा याचा अर्थ आहे. या ब्रँडबद्दल म्हणताना बोलते सई म्हणते, " ब्रँड लाँच करण ही संकल्पना डोक्यात अशी नव्हती पण फॅन्सच्या मनात नुसतं राहायच नाही तर उरायचं आहे आणि हे मी या निमित्ताने करू शकते म्हणून कायम आपल्या फॅन्स सोबत मनापासून जोडले जाऊ आणि या ब्रँड मुळे त्यांचा मनात राहू ही या मागची संकल्पना होती आणि म्हणून हा ब्रँड लाँच होतोय. हा फक्त ब्रँड नाही तर माझ्याकडून माझ्या फॅन्स साठी प्रेक्षकांसाठी असलेलं हे एक रिटर्न गिफ्ट आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने तो लाँच करण यासारखा दुसरा मुहूर्त नाही म्हणून फॅन्स साठी असलेलं हे खास रिटर्न गिफ्ट आहे. या Merchandise ला सगळेच खूप प्रेम देतील यात शंका नाही आणि मी उद्योजिका फक्त पेपर वर झाली पण मानसिकरित्या ते काही पटत नाही तुम्ही सगळेच याला भरभरून प्रेम द्याल आणि असच काम करण्यासाठी यातून प्रेरणा द्याल अशी आशा आहे"

ब्रँडचं नाव काय असावा हा प्रश्न असताना माझ्या अगदी जवळच्या मित्राने याला छान असं माझ्या पर्सनालिटीला शोभेल असं नाव सुचवलं आहे आणि यातून "मॅडम एस" (madame S) हा Merchandise ब्रँड आम्ही लाँच करतोय. क्वीन ऑफ स्यासी ट्यूड सारखा असलेला माझा स्वभाव आणि यातून आलेलं हे कमाल नाव माझ्या Merchandise ला मिळाल आहे आणि हा ब्रँड आजपासून तुमचा झाला आहे असं मी म्हणेल.

सकाळ
Sai Tamhankar: अभिनयचं नाही तर सईने शाळेत असताना 'या' क्षेत्रातही केलंय काम, "मी बोनस पॉईंट मिळवण्यासाठी प्रसिद्ध होते..."

"ग्राउंड झिरो", "अग्नी" सारखे दोन उत्तम चित्रपट आणि आता "मटका किंग" सारखी वेब सीरिज या व्यतिरिक्त सई "डब्बा कार्टेल" या वेब सीरिजमध्ये सुद्धा दिसणार असून 2024 वर्ष सईसाठी आता पुन्हा एकदा खास झालं आहे.

सई एकीकडे बॉलिवुडवर अधिराज्य गाजवत आहे तर आता हे merchandise लाँच करून तिने स्वतः ची कल्पकता यातून दाखवून दिली आहे. 2024 मध्ये सईच्या बॉलिवुड प्रोजेक्ट्सची लाईन खूप मोठी असली तरी आता सई हा ब्रँड किती नावीन्यपण प्रेक्षकांच्या समोर घेऊन येणार हे बघण आता उत्सुकतेच ठरतंय. बॉलिवुडला सईच्या अभिनयाची पडलेली भुरळ आता अता नवा कोरा ब्रँड या दोन्ही गोष्टींचा समतोल साधत सई 2024 वर्ष दमदार करणार यात शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com