Sakal Premier Award : ‘आत्मपॅम्फ्लेट’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंतांसह रसिक ज्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते, त्या ‘सकाळ प्रीमियर अवॉर्ड सोहळ्या’त ‘आत्मपॅम्फ्लेट’ सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.
Sakal Premier Award 2024 event
Sakal Premier Award 2024 eventsakal

ठाणे - मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंतांसह रसिक ज्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते, त्या ‘सकाळ प्रीमियर अवॉर्ड सोहळ्या’त ‘आत्मपॅम्फ्लेट’ सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. ‘सुभेदार’ने सर्वाधिक पाच पुरस्कार पटकावून या प्रतिष्ठेच्या सोहळ्यात ‘सुभेदारी’ गाजवली. ‘महाराष्ट्र शाहीर’साठी अंकुश चौधरी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला. मधुरा वेलणकरला ‘बटरफ्लाय’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे आणि प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीसाठी ‘विशेष सन्मान’ पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘सकाळ प्रीमियर परफॉर्मर ऑफ द इयर’चा पुरस्कार अदा शर्मा हिला प्रदान करण्यात आला. ‘सकाळ प्रीमियर पॉप्युलर फेस आॅफ द इयर’ पुरस्काराने राशी खन्ना हिला गौरवण्यात आले. छाया कदम यांना ‘सकाळ प्रीमियर आयकॉन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात बुधवारी (ता. १२) रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांसह वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली होती. ‘आत्मपॅम्फ्लेट’ सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. ‘आत्मपॅम्फ्लेट’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि कथा विभागात आशीष बेंडे यांनी पुरस्कार पटकावला. फैजल महाडिक व इमरान महाडिक यांनी सर्वोत्कृष्ट संकलक पुरस्कार मिळवला.

लवकरच ‘सन मराठी’वर प्रसारण

पी. एन. जी. ज्वेलर्स लिमिटेड मुख्य प्रायोजक असलेल्या प्रीमियर पुरस्कार सोहळ्याचे प्रसारण ‘सन मराठी’ मनोरंजन वाहिनीवर लवकरच होणार आहे. बहारदार नृत्य व सूत्रसंचालकांनी विणलेली गंमतजंमत, मराठमोळ्या रॅप साँगची जादू आणि विजेत्यांशी झालेल्या हृद्य संवादाने सोहळ्यात रसिक अक्षरश: भारावून गेले.

‘सुभेदार’ची सुभेदारी!

मुळाक्षर प्रॉडक्शनच्या ‘सुभेदार’ने सर्वोत्कृष्ट छायादिग्दर्शक (प्रियांका मयेकर), सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक (प्रतीक रेडीज), सर्वोत्कृष्ट संगीतकार (देवदत्त मनीषा बाजी), सर्वोत्कृष्ट संवाद (दिग्पाल लांजेकर) आणि सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक चित्रपट अशा पाच पुरस्कारांवर मोहोर उमटवली.

‘सकाळ’ माध्यमासोबत माझे नाते अनेक वर्षांचे आहे. ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार’ हा खूप मानाचा आणि महत्त्वाचा पुरस्कार आहे. प्रीमियर पुरस्कारासाठी अनेक चित्रपटांमध्ये चुरस होती. त्यांच्यापैकी कोणी एक विजेता निवडणे खरेच खूप अवघड होते; पण सहभागी झालेला प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ हा विजेता आहे.

- डाॅ. सौरभ गाडगीळ, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स लि.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com