Sonakshi Sinha: सलमाननं सोनाक्षीच्या होणाऱ्या सासऱ्यांकडून घेतलं होतं कर्ज; स्वत: सांगितला किस्सा, म्हणाला, "त्याचे व्याज..."

Salman took the loan from Iqbal Ratanasi: सलमाननं काही वर्षांपूर्वी इक्बाल रतनसी यांच्याबाबत एक पोस्ट शेअर केली होती.
सलमाननं सोनाक्षीच्या होणाऱ्या सासऱ्यांकडून घेतलं होतं कर्ज; स्वत: सांगितला किस्सा, म्हणाला, "त्याचे व्याज..."
Salman Khan sakal
Updated on

Salman Khan: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सोनाक्षी सिन्हाच्या (Sonakshi Sinha) लग्नाची चर्चा होत आहे. सोनाक्षी ही अभिनेता झहीर इक्बालसोबत लग्नबंधनात अडकणार आहे, असं म्हटलं जात आहे. अभिनेता झहीर इक्बालसोबत सलमान खानचं खास नातं आहे. सलमाननं झहीरला बॉलिवूडमध्ये लाँच केलं होतं. तसेच झहीरचे वडील इक्बाल रतनसी हे सलमान खानचे बालपणीपासूनचे मित्र आहेत. सलमाननं काही वर्षांपूर्वी इक्बाल रतनसी यांच्याबाबत एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये सलमाननं इक्बाल रतनसी यांनी त्याला दिलेल्या कर्जाबद्दल सांगितलं होतं.

सलमाननं पोस्ट शेअर करत चाहत्यांना सांगितला किस्सा

सलमाननं खाननं 2018 मध्ये ट्विटरमध्ये (X) इक्बाल यांचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, “हा माझा बालपणीचा मित्र इक्बाल, मी जेव्हा टीनेजर होते तेव्हा हाच माझी बँक होता, मी त्याच्याकडून घेतलेले 2011 रुपये अजूनही त्याला परत दिले नाहीत. त्याने अजून यावर व्याज घेतले नाही, यासाठी मी देवाचे आभार मानतो. त्याच्या मुलाला मी लाँच करत आहे, त्यामुळे मी त्याची पोस्ट शेअर करुन शकतो. (बेटे को लॉन्च कर रहा हूँ तो बाप का पोस्ट तो करसकता हूँ ना) त्याचा हा फोटो मला खूप आवडतो.”

झहीरचे वडील इक्बाल हे कन्स्ट्रक्शन आणि ज्वेलरीचा व्यवसाय करतात. त्याची मुलगी आणि झहीरची बहीण सनम ही एक प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे. झहीरनं नोटबुक या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं. या चित्रपटाची निर्मिती सलमानने केली होती.

सलमाननं सोनाक्षीच्या होणाऱ्या सासऱ्यांकडून घेतलं होतं कर्ज; स्वत: सांगितला किस्सा, म्हणाला, "त्याचे व्याज..."
Sonakshi Sinha Wedding Card: अफवा नाही खरं! मॅगझीन थीम, रोमँटिक फोटो, सोनाक्षी- जहीरच्या लग्नाची पत्रिका व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.