Salman Khan: भाईजानच्या ‘सिकंदर’ची पहिली झलक आली समोर, चाहत्यांमध्ये आनंदाची लाट

Sikandar Movie Latest Update: कव्हर पेजवर सिकंदरचे पोस्टर आहे. यासोबतच सलमान खानचा लोकप्रिय ब्रेसलेटही दिसत आहे.
Salman Khan: भाईजानच्या ‘सिकंदर’ची पहिली झलक आली समोर, चाहत्यांमध्ये आनंदाची लाट

Sajid Nadiadwala: सलमान खान बॉलीवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहे, ज्याच्या चित्रपटांची सर्व चाहत्यांना आतुरता असते. त्याचे जगभरात फॅन फॉलोअर्स आहेत. सध्या हा अभिनेता त्याच्या आगामी सिकंदर या चित्रपटासाठी चर्चेत आहे. (bollywood)

आता सलमान खानच्या या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. सिकंदरच्या निर्मात्यांनी आज या चित्रपटाची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. नाडियाडवाला यांच्या अधिकृत सोशल मीडया अकाउंटवरून एक फोटो शेअर करण्यात आला आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये एक मोबाईल फोन दिसत आहे, ज्याच्या कव्हर पेजवर सिकंदरचे पोस्टर आहे. यासोबतच सलमान खानचा लोकप्रिय ब्रेसलेटही दिसत आहे.

सोबत लिहिले आहे-लाइट, कॅमेरा आणि सिकंदर. पुढील वर्षी २०२५ मध्ये ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सिकंदरमध्ये सलमान खानसोबत रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सलमान खानच्या सिंकदरची चर्चा सुरू झाल्यापासून रसिकांना याची उत्सुकता लागून राहिली आहे, त्यातच आता पहिली झलक समोर आल्याने त्याचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. साजिद नाडियाडवाला सिकंदर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. काही दिवसांपूर्वीच सिकंदरची घोषणा करण्यात आली होती, तर दक्षिणेचे प्रसिद्ध दिग्दर्शक ए. आर. मुरुगदास दिग्दर्शित करत आहेत.(Salman Khan News Movie)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com