बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याचा एक मोठा खुलासा समोर आला आहे, त्यानुसार लॉरेन्स बिश्नोई टोळी पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाप्रमाणे सलमान खानची हत्या करण्याचा कट रचत होती. या संदर्भात महाराष्ट्राच्या पनवेल पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात सलमान खानच्या हत्येच्या कटातील पाकिस्तानचे कनेक्शनही समोर आले आहे. त्यांच्या गुप्तचर तपासात, पोलिसांनी संशयितांच्या मोबाइल फोन टॉवर स्थानासारख्या इनपुटच्या विश्लेषणाद्वारे माहिती गोळा केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पनवेल पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीने पाकिस्तानकडून एके-47 सह अनेक शस्त्रे घेण्याचा विचार केला होता. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पनवेल फार्महाऊसमधून बाहेर पडत असताना करण्यात येणार होता असा आरोप आहे.
गेल्या आठवड्यात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात हल्ल्याची योजना आणि पळून जाण्याच्या मार्गांचा समावेश होता. 350 पानांच्या या आरोपपत्रात लॉरेन्स गँगच्या 5 जणांची नावे आहेत. यामध्ये अजय कश्यप, गौतम भाटिया, वास्पी महमूद खान, रिझवान हसन, दीपक हवा सिंग यांच्या नावांचा समावेश आहे.
एप्रिलमध्ये पनवेलचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याकडून लॉरेन्स गँग सलमान खानवर हल्ल्याची योजना आखत असल्याची गुप्तचर माहिती मिळाली होती. सलमान खानवरील हल्ल्यासाठी लॉरेन्स बिश्नोईने टोळीला २५ लाख रुपयांचे कंत्राट दिल्याचे नंतरच्या तपासात उघड झाले. या टोळीने १५-१६ लोकांचा व्हॉट्सॲप ग्रुप वापरला होता, ज्यामध्ये अनमोल बिश्नोईचाही समावेश होता, असे अहवालात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.