बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर धमकीचा मेसेज आला आहे, ज्यामध्ये अभिनेता सलमान खानकडून लॉरेन्स बिश्नोईसोबतचे वैर संपवण्यासाठी 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. "या मेसेजला हलक्यात घेऊ नका अन्यथा सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षा खूपच वाईट होईल," असे या धमकीच्या मेसेजमध्ये म्हटले आहे.
17 ऑक्टोबर रोजी बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या शार्प शूटर सुक्खाला नुकतीच अटक केली आहे.