Samantha Ruth Prabhu : केरळमधील घटनांचे पडसाद टॉलिवूडमध्ये ! सामंथाची तेलंगणा सरकारकडे लैंगिक छळाचा अहवाल उघड करण्याची मागणी

Samantha Requests To Telangana Government On Tollywood Sexual Harassment : केरळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये हेमा समितीने सादर केलेल्या अहवालावरून तेथील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांनी खळबळ उडवली. याबद्दल अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूने केरळच्या समितीचे कौतुक केलं.
Samantha Requests to Govt
Samantha Requests to GovtEsakal
Updated on

Entertainment News : अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूने सोशल मीडियावर विमेन इन सिनेमा कलेक्टिव्ह जी WCC या नावाने ओळखली जाते यांच्या वतीने एक खास पोस्ट शेअर केली. केरळमधील महिला समितीने केलेल्या प्रयत्नांचे तिने या पोस्टमार्फत कौतुक केलं. केरळमधील हेमा समितीने इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक रिपोर्ट उघड केल्याबद्दल तिने त्यांचं अभिनंदन केलं आणि तेलंगणा सरकारकडे तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमधील लैंगिक छळाबद्दलचा अहवाल उघड करण्याचं आवाहन केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.