Teaser Out : दिव्य अनुभवाची प्रचिती देणारा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Sant Dnyaneshwaranchi Muktaai Teaser : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला. सोशल मीडियावर हा टीझर चर्चेत आहे.
Sant Dnyaneshwaranchi Muktai
Sant Dnyaneshwaranchi Muktai Esakal

ऐतिहासिक कथा रुपेरी पडद्यावर भव्य पद्धतिने सादर करणारे लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर पुन्हा एकदा एक भव्य कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. महाराष्ट्र आणि संतपरंपरेचं एक वेगळं नातं आहे. अशाच एका संतपरंपरेची कथा दिग्पाल लांजेकर त्यांच्या आगामी चित्रपटातून सादर करत आहेत.

निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता ही साक्षात दिव्यत्वाची ही चार रूपं, या भावंडांच्या संतपणाची महती सांगत मुक्ताईच्या दृष्टीकोनातून संत ज्ञानेश्वरांच्या दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य आध्यात्मिक मराठी चित्रपट २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. दिव्य अनुभवाची प्रचिती देणाऱ्या या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून या टीझरला प्रतिक्रिया मिळण्यास सुरुवात झालीय. चित्रपटात बालपणीच्या संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर, मुक्ताईच्या भूमिकेत ईश्मिता जोशी तर निवृत्तीच्या भूमिकेत साहिल धर्माधिकारी आणि सोपानच्या भूमिकेत अभीर गोरे आहे.

महिला संतमालिकेत मुक्ताबाई यांचा जीवनसंघर्ष आणि त्या संघर्षातून आलेली ज्ञानदृष्टी अलौकिक आहे. त्यांच्या श्रेष्ठत्वाचा गौरव सर्वच संतांनी केलेला आहे. हे श्रेष्ठत्व सहज मिळालेले नव्हते, तर त्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या दिव्यातून जावे लागले. त्यात सर्वांत लहान असलेल्या मुक्ताबाईला खूप मोठी जबाबदारी स्वतःवर घ्यावी लागली. ‘देहरूपाने संपले तरी कार्यरूपाने संजीवन असणाऱ्या मुक्ताबाईंच्या कार्य व विचारांचे सार ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून मांडण्यात आले आहे. या चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.केतकी गद्रे अभ्यंकर कार्यकारी निर्मात्या आहेत.

संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिर छायाचित्रे प्रथमेश अवसरे यांचे आहेत. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनीसंयोजन निखिल लांजेकर यांचे आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत तर सहनिर्माते सनी बक्षी आहेत.

Sant Dnyaneshwaranchi Muktai
Digpal Lanjekar Subhedar: खरा शिवभक्त! दिग्पाल लांजेकरांनी तान्हाजींच्या साताऱ्यात केलंय 'हे' महत्वाचं काम

दिग्पाल लांजेकर यांनी आत्तापर्यंत आणलेल्या शिवराज अष्टकातील चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळाला. ज्यात फत्तेशिकस्त, फर्जंद,पावनखिंड, सुभेदार, शेर शिवराज या चित्रपटांचा समावेश होता. त्यानंतर अध्यात्मिक कथा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाच्या माध्यमातून ते घेऊन येत आहेत.

Sant Dnyaneshwaranchi Muktai
Digpal Lanjekar Subhedar: ऑर्डर न करताही गोडधोडाचे पदार्थ आले अन्.. अज्ञात मावळ्याचं प्रेम पाहून दिग्पालच्या डोळ्यात पाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com