Sarabjit Movie : 'अखेर आम्हाला न्याय मिळाला', सरबजीत यांच्या मारेकऱ्याची हत्या करणाऱ्यांचे रणदीपने मानले आभार

भारतीय नागरिक असलेल्या सरबजीत सिंह यांना पाकिस्तान सरकारने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बॉम्बस्फोट केल्याप्रकरणी १९९० साली अटक करून कैद केलं होतं.
randeep hooda
randeep hoodasakal
Updated on

भारतीय नागरिक असलेल्या सरबजीत सिंह यांना पाकिस्तान सरकारने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बॉम्बस्फोट केल्याप्रकरणी १९९० साली अटक करून कैद केलं होतं. या प्रकरणात त्यांना फाशी झाली होती पण बराच काळ या शिक्षेची अंमलबजावणी प्रलंबित राहिली.

ते कित्येक वर्षं पाकच्या तुरुंगात होते. त्यांच्या कुटूंबाकडून त्यांना भारतात परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले पण त्यात त्यांना यश आलं नाही. अखेर २०१३ साली पाकिस्तानी कैद्यांनी केलेल्या हल्ल्यात सरबजीत यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमागे आमिर सरफराज याचा हात होता पण नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार काही अज्ञातांनी आमिर याची हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे.

ही बातमी सगळीकडे पसरताच अभिनेता रणदीप हुड्डाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मारेकऱ्यांचे आभार मानले. आपल्याला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली.

काय म्हणाला रणदीप?

'कर्म अज्ञात व्यक्तीचे आभार

मला माझी बहीण दलबीर कौरची आठवण येतेय. स्वपनदीप आणि पूनम यांनाही माझं खूप प्रेम. आज शहीद सरबजीत सिंग यांना न्याय मिळाला.'

असं ट्विट रणदीपने इंडिया टुडेची बातमी रिपोस्ट करत X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलं.

ओमंग कुमार दिग्दर्शित सरबजीत सिनेमात रणदीपने सरबजीत सिंग यांची भूमिका साकारली होती तर या सिनेमात ऐश्वर्या राय हिने सरबजीत यांची बहीण दलबीर कौरची भूमिका साकारली होती. २०१६ साली रिलीज झालेल्या या सिनेमाचं सगळीकडे कौतुक झालं होतं. या सिनेमामुळे रणदीप आणि सरबजीत सिंह यांच्या कुटूंबाचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे या बातमीनंतर रणदीपने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याचा आनंद व्यक्त केला.

सरबजीत सिंह यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं?

९० च्या दशकात पाकिस्तानच्या न्यायालयाने दहशत पसरवणे, बॉम्बस्फोट आणि हेरगिरी करणे या आरोपांखाली अटक करत फाशीची शिक्षा सुनावली होती. बराच काळ हे प्रकरण प्रलंबित होतं. सरबजीत यांची बहीण दलबीर यांनी त्यांच्या भावाला सोडवण्यासाठी बराच काळ लढा दिला. एप्रिल २०१३ मध्ये कैद्यांनी केलेल्या हल्ल्यात सरबजीत यांचा मृत्यू झाला. अखेरपर्यंत त्यांना पाकिस्तानातून भारतात सोडण्यात यावं म्हणून त्यांच्या कुटूंबीयांकडून प्रयत्न करण्यात येत होते. सरबजीत यांनी चुकून सीमा ओलांडल्याचं त्यांच्या जबानीत म्हंटलं होतं पण न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.