Bollywood Entertainment News : 1995 साली रिलीज झालेला शाहरुख खान आणि काजोलचा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा सिनेमा सुपरहिट ठरला. फक्त 40 लाख रुपये बजेट असलेल्या या सिनेमाने तब्बल 102 करोड रुपयांची कमाई केली होती. आदित्य चोप्रा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आजही या सिनेमाचे अनेक सीन्स प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. पण तुम्हाला माहितीये का शाहरुखने दिगदर्शकाशी भांडण करून क्लायमॅक्समधील काही सीनमध्ये बदल करवून घेतले. ज्यामुळे हा सिनेमा सुपरहिट ठरला.