Shahid Kapoor: शाहिद कपूर पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याचं आडनाव वेगळं होतं.. निर्मात्याने सांगितली खास आठवण

Shahid Kapoor made his film debut with Ishaq Vishk in 2003: जेष्ठ निर्माते रमेश तौरानी यांनी उलगडला शाहिद कपूरच्या अभिनयाचा प्रवास..
shahid kapoor pankaj kapoor surname khattar
shahid kapoor pankaj kapoor surname khattaresakal
Updated on

Ramesh Taurani: बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अशी ओळख असलेल्या शाहिद कपूरने 2003 मध्ये इश्क विश्क या चित्रपटातून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. नुकत्याच झालेल्या मुलाखतीमध्ये, जेष्ठ निर्माते रमेश तौरानी यांनी शाहीदला त्या भूमिकेसाठी कसे निवडले याबद्दल सांगितले.

कबीर सिंग, जर्सी, हैदर, जब वी मेट किंवा अजून कोणतेही चित्रपट असो शाहिद कपूरने अनेक वर्षापासून आपल्या अभिनयातुन रसिकाची मने जिंकली आहेत. विवाह मधील प्रेम आणि जब वी मेट मधील आदित्य यांमधील अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. हैदर आणि कबीर सिंग यांसारख्या चित्रपटामधून त्याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. त्याने अभिनयाचा प्रवास सुरू केला तो म्हणजे इश्क विश्क या चित्रपटापासून, परंतु अनेकांना माहिती नाही की त्या वेळेस कास्टींगसाठी गेलेल्या शाहिद कपूरने आपलं नाव शाहिद खट्टर म्हणून सांगितलं होतं. मुलाखतीमध्ये, जेष्ठ निर्माते रमेश तौरानी यांनी त्याच्या 'आँखों में तेरा ही चेहरा' या गाण्यामधून शाहीद किती उत्कृष्ठ कलाकार आहे याची आठवण होत असल्याचे सांगितले.

shahid kapoor pankaj kapoor surname khattar
मराठमोळ्या शिव्या आणि गुलाबी साडी; 'डेडपूल अँड वूल्व्हरिन' चित्रपटाच्या मराठी ट्रेलरचा धुमाकूळ, डायलॉग ऐकलेत का?

रमेश तौरानी पुढे सांगतात, त्यांना माहिती नव्हतं की शाहिद कपूर हा जेष्ठ अभिनेते पंकज कपूर यांचा मुलगा आहे कारण त्याने आपले खरे आडनाव वापरले नव्हते. त्यांनी 'न्यूज18 शोशा'सोबत शेअर केले की, “शाहिद हा पंकज कपूरचा मुलगा आहे हे मला माहीत नव्हते. त्याचे नाव आधी शाहिद खट्टर होते, कपूर नाही. चित्रपटात त्याने ते बदलून कपूर केले. पंकजपासून वेगळे झाल्यानंतर शाहिदची आई नीलिमा अजीमने अभिनेता राजेश खट्टरसोबत लग्न केले. शाहिदचा धाकटा सावत्र भाऊ इशान खट्टर हा राजेशचा मुलगा आहे.

ते म्हणाले, “शाहिदने 'आँखों में तेरा ही चेहरा' हा म्युझिक व्हिडिओ बनवला होता. तेव्हा तो अगदी तरुण होता. माझा अंदाज आहे फक्त 17-18 वर्षांचा. जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तेव्हा मी माझ्या टीमला 'या मुलाला भेटायला सांगा', असे सांगितले. सुमारे दीड महिन्यानंतर तो मला भेटायला आला. भेटल्यावर मी त्याला म्हणालो, 'तू खूप चांगला आहेस. आणि मला वाटते की तू एक चांगला अभिनेता बनू शकतोस. पण तू खूप तरुण दिसत आहेस, म्हणून मला वाटतं तू थांबायला हवं, पण तुला एक चांगलं पदार्पण करायला मिळेल".

'इश्क विश्क'ची निर्मीती कशी झाली ?

तौरानी आपल्या मुलाखतीमध्ये सांगतात, इश्क विश्कचे दिग्दर्शक केन घोष यांनी चित्रपटासंबंधित आइडिया शाहिदसोबत शेअर केल्या आणि त्यालाही ती आवडली होती तसेच दिग्दर्शकाच्या दृष्टाकोनातून तो या कास्टींगसाठी उत्कृष्ठ आहे हेदेखील समजले. दिग्दर्शकाने जेव्हा त्याचा म्युजिक व्हिडीओ पाहिला तेव्हा त्याच्यामध्ये एक भाबडेपणा, निखळपणा असल्याचे निरीक्षण केले आणि तोच या भूमिकेसाठी योग्य असल्याचे सांगितले. तुम्ही कधी निरीक्षण केले असेल तर तुम्हाला समजेल की, अजय देवगण आणि सलमान खान यांच्या अभिनयातुन भाबडेपणा, निखळपणा दिसून येत होता ज्यामुळे त्यांनी बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमावले आहे.

shahid kapoor pankaj kapoor surname khattar
Athiya-Rahul: आथिया शेट्टी- के एल राहुल बनले आमिर खानचे शेजारी; खरेदी केला कोट्यवधींचा फ्लॅट, पॉश एरियामधील घराची किंमत किती

इश्क विश्क, हा एक कॉलेज रोमँटीक -कॉमेडी चित्रपट आहे, शाहिद कपूरसाठी ही जोरदार सुरुवात होती . नुकतीच त्याने चित्रपट सृष्टीमध्ये आपली 21 वर्षे पूर्ण केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.