मुंज्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत १०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविले आहे. तर आता कल्की चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. हे दोन्ही चित्रपट हॉरर असले तरी प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगली दाद दिलीय. विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटातील हॉरर भूमिका साकारलेल्या कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलंय.
पण तुम्हाला माहितीच असेल की पडद्यासमोरच्या कलाकारासोबत पडद्यामागेही एक कलाकार दडलेला असतो. खरतरं पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांमुळेच कधी कधी चित्रपट गाजतो. असंच काहीसं मुंज्या कल्की चित्रपटाबाबतीत आहे.
आज आम्ही तुम्हाला त्या दोन कलाकारांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी अभिनेत्री शर्वरी वाघ हिचा मुंज्या आणि अमिताभ बच्चन यांचा 'कल्की' यां दोन्ही चित्रपटांमध्ये अशा प्रकारे मेकअप केला होता की, तुम्हाला त्याची प्रोसेस पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.
मनीष शर्मा यांनी मुंज्याचा मेकओव्हर केला होता
'मुंज्या' चित्रपटाचा अवतार प्रभावी आणि धडकी भरवणारा होता. यासाठी खास मेहनत मेकअप आर्टिस्ट मनीष चंद्र शर्मा यांनी घेतली आहे. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ देखील पोस्ट केला होता, ज्यामध्ये अभिनेत्री शर्वरीची मेकओव्हर प्रोसेस दाखवण्यात आली होती.
स्वतः शर्वरी वाघ हिनेदेखील आपल्या इंस्टा पेजवर या मेकओव्हरचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी तिनं या मेकओव्हरबद्दल सांगितलं. ती म्हणाली, तिला मुंज्या भूत होण्यासाठी पाच तास लागले. शूटिंग संपल्यानंतर हा मेकअप काढण्यासाठी दीड तास लागला.
तसेच, चित्रपटात दाखवलेला मुंज्या हा खरा नसून संगणकाने तयार केलेली ती प्रतिमा आहे. तेच भूत जेव्हा तिच्यावर ताबा घेते तेव्हा तीही मुंज्या बनते. भूताच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी तिने तिच्या देहबोलीवर खूप मेहनत घेतली.
नुकतचं कल्की चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थामाची भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेसाठी अमिताभ बच्चन यांनी जेवढी मेहनत घेतली, तेवढीच मेहनत त्यांच्या मेकअप आर्टिस्टनेही केली. प्रीति शील यांनी अमिताभ यांचा हॉरर मेकअप केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.